तिथी
|
आषाढ शुक्ल १२ (१८:२६)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
जेष्ठा (१५:२८)
|
योग
|
ब्रह्मा (८:००)
|
करण
|
बालव (१८:२६), कौलव (--:--)
|
शाक-गोपद्म व्रतारंभ
स्नान करून
देवघरात किंवा तुळशीपुढे ३३ गोपद्म काढून त्याची पूजा करावी. कार्तिक शुल्क
एकादशीपर्यंत ४ महिने दररोज हे व्रत करतात.
वामन पूजन
आषाढ शुक्ल
द्वादशीला वामनावताराचे यथाविधी पूजन करून व्रत केल्यास यज्ञासमान फळ मिळते. व्रत
असे आहे- प्रत्यक्षमूर्ती असेल तर तिच्यासमोर बसावे; नसेल तर सोन्याची
करून तांब्याच्या संपुष्टात तुलसीपत्रावर स्थापन करावी. तेही शक्य नसेल तर
शालिग्रामाच्या मूर्तीची पुरुषसूक्तोक्त मंत्राने षोडशोपचार पूजा करावी
घबाड
१५:२८ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ
योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: पुष्य
चंद्र
नक्षत्र : जेष्ठ
तिथी: शुक्ल १२ = १२
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११ x ३ = ३३
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १२ तिथी
मिळवू : ३३ + १२ = ४५
आता
७ ने भागू ४५ / ७ = ६ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
द्वादशी श्राद्ध
अपराण्ह काळी द्वादशी
तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी आषाढ शुक्ल १२ आहे
त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म
करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment