तिथी
|
आषाढ शुक्ल २ (२४:५५)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
पुष्य (१६:०६)
|
योग
|
वज्र (२४:२१)
|
करण
|
बालव (१४:४२), कौलव (२४:५५)
|
चंद्रदर्शन
अमावास्येला दिसेनासा
झालेला चंद्र रवीच्या पुढे १२ अंश गेला कि दिसू लागतो. २०:४२ ला पश्चिम दिशेला
चंद्र दर्शन होईल. सामुदायिक मुहूर्त १५ म्हणजे महर्घ आहे.
द्वितीयाव्रत
आषाढ शुक्ल
द्वितीयेस हे व्रत करतात. ही चंद्राची द्वितीय कला क्रियारूप असते. ही अश्विनीकुमारांची
जन्मतिथी मानलेली आहे. ही द्वितीया 'रथद्वितीया' म्हणून ओळखली जाते. त्या दिवशी पुरीच्या जगन्नाथाची रथातून
मिरवणूक काढतात. द्वितीयेचे रूपध्यान असे-
'द्वितीया हंसगा शुभ्रा पात्रपुस्तकधारिणी ।'
रथयात्रा महोत्सव
आषाढ शुक्ल
द्वितीये दिवशी पुष्यनक्षत्र येईल तर सुभद्रेसह भगवानाला रथातून फिरवून आणावे व
यथास्थान स्थापना करावी. या दिवशी जगन्नाथपुरीला श्रीजगदीशाला सपरिवार (बलराम, रुक्मिणी, सुभद्रा व श्रीकृष्ण )
विशाल रथात बसवून फिरवून आणतात. तो सोहळा अद्वितीय असतो. सर्व देशभर प्रांतातून
अनेक लोक या यात्रेसाठी एकत्र आलेले असतात. त्याच दिवशी जयपूर वगैरे ठिकाणी भगवान
रामचंद्रांना रथातून मिरवत नेतात व वाल्मीकी रामायणातील युद्धकांडाचा भाग वाचतात
आणि त्याचवेळी धनधान्य पेरुन वार्षिक शेतीकार्यास सुरुवात करतात. त्या वेळी
भगवंताच्या भक्तांच्या घरी व्रतउपवास असतो व महोत्सवही करतात. या व्रताच्या
आचरणाने सर्व पापांतून मुक्ती मिळते व वैकुंठलोक प्राप्त होतो. त्या व्रतामुळे
सर्पभय दूर होते. कारण भक्तांचे रक्षण स्वतः शेषनारायण करीत असतात.
द्वितीया श्राद्ध
अपराण्ह काळी द्वितीया
तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी जेष्ठ आषाढ शुक्ल २ आहे
त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment