Friday, 27 July 2018

दिनविशेष - २९ जुलै २०१८



तिथी
आषाढ कृष्ण २ (अहोरात्र)
वार
रविवार
नक्षत्र
धनिष्ठा (अहोरात्र)
योग
आयुष्मान (१३:००)
करण
तैतिल (१७:३२), गरज (--:--)


अशून्यशयनव्रत

शेषशय्येवर असलेल्या श्रीवत्स चिन्हांकित ४ भुजांनी युक्त आणि लक्ष्मीसहित विराजमान झालेल्या नारायणाची पूजा करावी, दिवसभर मौन पाळावे. चंद्रोदयानंतर अर्घ्य देऊन भोजन करावे. या व्रताने घरावरील संकट टळते व अखंड सौभाग्य, सुख मिळते असे भविष्य पुराणात सांगितले आहे. हे व्रत मार्गशीर्षापर्यंत प्रत्येक कृष्ण द्वितीयेस करावे.

द्वितीया श्राद्ध

अपराण्ह काळी द्वितीया तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी आषाढ कृष्ण २ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment