Saturday, 23 September 2017

दिनविशेष - २६ सप्टेंबर २०१७


तिथी
 आश्विन शुक्ल ६ (१६:४१)
वार
 मंगळवार
नक्षत्र
 अनुराधा (अहोरात्र)
योग
 प्रीति (०८:४७)
करण
 तैतिल (१६:४१), गरज (२९:५४)

बिल्वनिमंत्रण

आश्‍विन शुक्ल षष्ठीला प्रात:स्नानादी नित्यकर्मे झाल्यावर देवीची पूजा करावी आणि ज्येष्ठा नक्षत्र असेल तर त्यांच्या पूजेसाठी बिल्ववृक्षाला निमंत्रण करावे.

घबाड

७:०३ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: उत्तराफाल्गुनी
चंद्र नक्षत्र : अनुराधा
तिथी: शुक्ल ६ = ६
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६ x ३ = १८
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ६ = २४
आता ७ ने भागू  २४ / ७ = ३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

रवि हस्त नक्षत्र प्रवेश

२९:५८ ला रवि हस्त नक्षत्रात प्रवेश करीत आहे.
रविचे मृग नक्षत्र ते हस्त नक्षत्र संक्रमण हा काळ भारतात पावसाळ्याचा मुख्य काळ समाजाला जातो.
रवि नक्षत्र : उत्तराफाल्गुनी
चंद्र नक्षत्र : मृग

वाहन: बेडूक

रवि नक्षत्र प्रवेशाच्या वेळी चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे यावरून वाहन ठरते. सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत मोजावे, त्यास ९ ने भागून बाकी किती राहते त्याप्रमाणे वाहन ठरते.
बाकी
वाहन
पर्जन्य वृष्टीचे स्वरूप
घोडा
पर्वतावर पाऊस पडेल
कोल्हा
पाऊस पडणार नाही.
बेडूक
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
मेंढा
पाऊस पडणार नाही.
मोर
अल्पवृष्टी होईल.
उंदीर
अल्पवृष्टी होईल.
महिष
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
गाढव
अल्पवृष्टी होईल.
० / ९
हत्ती
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
रवि नक्षत्र : हस्त
चंद्र नक्षत्र : जेष्ठा
अंतर : ६
६ ला ९ ने भागले असता बाकी राहते ६. म्हणून वाहन उंदीर आहे. याचाच अर्थ रवि हस्त नक्षत्रात असताना अल्पवृष्टी होईल.

नक्षत्रसंज्ञा : सूर्य-सूर्य

सूर्य नक्षत्रे
रोहिणी, मृग, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, जेष्ठा, मूळ, धनिष्ठा, शततारका, उत्तराभाद्रपदा
चंद्र नक्षत्रे
अश्विनी, भरणी, कृत्तिका, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, पूर्वा भाद्रपदा, रेवती

दोन्ही सूर्य नक्षत्रे
 वारा सुटेल
दोन्ही चंद्र नक्षत्रे
 पाऊस पडणार नाही
एक चंद्र व दुसरे सूर्य
 पाऊस पडेल
रवि नक्षत्र : हस्त = सूर्य नक्षत्र
चंद्र नक्षत्र : जेष्ठा =  सूर्य नक्षत्र
दोन्ही सूर्य नक्षत्र आहे. याचा अर्थ रवि हस्त नक्षत्रात असताना वारा सुटेल.

स्त्री-पुरुष-नपुंसक नक्षत्रे : स्त्री नपुंसक

स्त्री नक्षत्रे
 आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती
पुरुष नक्षत्रे
 अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा ,उत्तराभाद्रपदा, रेवती
नपुंसक नक्षत्रे
 विशखा, अनुराधा, जेष्ठा

सूर्य नक्षत्र स्त्री संज्ञक व चंद्र नक्षत्र नपुंसक : वारे सुटून वृष्टी मध्यम होईल
स्त्री पुरुष असा योग असेल तर: वृष्टी समाधान कारक होईल.

रवि नक्षत्र : हस्त = स्त्री नक्षत्र
चंद्र नक्षत्र : जेष्ठा = नपुंसक नक्षत्र
सूर्य नक्षत्र स्त्री संज्ञक व चंद्र नक्षत्र नपुंसक संज्ञक आहे त्यामुळे  रवि हस्त नक्षत्रात असताना वारे सुटून मध्यम वृष्टी होईल.

पावसाचा अंदाज घेताना या बरोबरच रविच्या नक्षत्र प्रवेशाची कुंडली मांडून त्यातील ग्रह स्थिती लक्षात घेणे देखील अत्यावश्यक आहे.

षष्ठी श्राद्ध

अपराण्ह काळी षष्ठी तिथी असल्यामुळेज्यांची श्राद्ध तिथी आश्विन शुक्ल ६ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळत्यानंतर ३ मुहूर्त संगव काळत्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळत्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Friday, 22 September 2017

दिनविशेष - २५ सप्टेंबर २०१७


तिथी
 आश्विन शुक्ल ५ (१४:२८)
वार
 सोमवार
नक्षत्र
 अनुराधा (अहोरात्र)
योग
 विष्कंभ (०८:०८)
करण
 बालव (१४:२८), कौलव (२७:३२)

घबाड

१४:२८ नंतर घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: उत्तराफाल्गुनी
चंद्र नक्षत्र : अनुराधा
तिथी: शुक्ल ६ = ६
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६ x ३ = १८
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ६ = २४
आता ७ ने भागू  २४ / ७ = ३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

पंचरात्रोत्सवारंभ

नवरात्र सुरू होण्यापूर्वी अशौच आले व महानवमीपूर्वी अशौच संपत असेल तर त्यानंतर सात, पाच, तीन अथवा एक दिवस जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस नवरात्र करावे. अशौचामुळे वर सांगितल्यामुळे कमी दिवसांचे नवरात्र करतात. अशा दिवसांचा उल्लेख सप्तरात्रोत्सवारंभ, पंचरात्रोत्सवारंभ, त्रिरात्रोत्सवारंभ अशा प्रकारे केलेला असतो. अशा दिवशी घटस्थापना करून नवमीपर्यंत नवरात्रीची पूजा करता येते.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Thursday, 21 September 2017

दिनविशेष - २४ सप्टेंबर २०१७


तिथी
 आश्विन शुक्ल ४ (१२:४०)
वार
 रविवार
नक्षत्र
 विशाखा (२८:२६)
योग
 वैधृति (७:५०)
करण
 विष्टि (१२:४०), बव (२५:३०)

ललिता पंचमी / उपांगललिताव्रत

हे व्रत आश्‍विन शुक्ल पंचमीला करतात. यासाठी रात्रिव्यापिनी पंचमी घेतात. व्रत करणाराने त्या दिवशी आघाड्याच्या २१ काटक्या घेऊन
'आयुर्बलमिदम्'
या मंत्राने एकेकाने याप्रमाणे दात घासून स्नान करावे व शुभ्र वस्त्र परिधान करून सुवर्णमयी उपांगललितेची 'यथो मिलितोपचार द्रव्यांनी' पूजा करावी. ४८ दुर्वांची एक जुडी याप्रमाणे ४८ जुड्या ललिता देवीला वहाव्यात. रात्री चंद्रोदय झाल्यावर त्याला अर्घ्य देऊन नक्‍त व्रत करावे. (तदुपरान्त भोजन करावे. ) दुसर्‍या दिवशी देवीचे विसर्जन करावे. हे व्रत महाराष्ट्रात विशेष प्रचलित आहे.

शांतिपंचमी

आश्‍विन शुक्ल पंचमीला प्रात:स्नानादी नित्यकर्मे उरकल्यावर एका वेदीवर किंवा चौरंगावर शुभ्र वस्त्र पसरून त्यावर हिरव्या व कोवळ्या दर्भाचे १२ नाग व एक इंद्राणी बनवून त्यांची स्थापना करावी. इंद्राणीला शुद्धोदकस्नान घालावे आणि नागांना घृत, पय व उदक या तिहींचे स्थान घालावे. गंधपुष्पादिकांनी पूजा करावी. विविध प्रकारच्या नागांचे ध्यान करावे आणि
'नागा: प्रीता भवन्तीह शान्तिमाप्नोति वै विभो ।
स शांतिलोकमासाद्य मोदते शाश्‍वती: समा: ।'
अशी प्रार्थना करून
'ॐ कुरू कुल्ल्यं हुं फट् स्वाहा'
मंत्राचा १२ हजार जप करावा. या कुशनिर्मित नागांपैकी अनंत आश्‍विनात, वासुकी कार्तिकात, शंख मार्गशीर्षात, पद्म पौषात, कम्बल माघात, कर्कोटक फाल्गुनात, अश्‍वतर चैत्रात, शंखपाल वैशाखात, कालिय ज्येष्ठात, तक्षक आषाढात, पिंगल श्रावणात, व महानाग भाद्रपदात याप्रमाणे त्यांची पूजा केली असता सर्पादिकांचे भय दूर होते, सर्व प्रकारची शांती पसरते व उपर्युक्‍त मंत्राने सर्पविष निष्प्रभ होते.

मृत्यू योग

२८:२५ नंतर रविवारी अनुराधा नक्षत्र असल्यामुळे मृत्यू योग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त

हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो. असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने
हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो. 
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष रहात नाही.

भद्रा

१२:४० पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.

उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्राकल्याणी अशी नावे आहेत.हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्धअष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.

अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.

भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला पादअसे म्हणतात.

ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
भद्रा मुख (निंद्य काळ)
शुक्ल चतुर्थी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल अष्टमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल एकादशी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
पोर्णिमा
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण तृतीया
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण सप्तमी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण दशमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण चतुर्दशी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका


तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ मनाला जातो.
भद्रेची तिथी
भद्रा पुच्छ
शुक्ल चतुर्थी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल अष्टमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल एकादशी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
पोर्णिमा
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण तृतीया
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण सप्तमी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण दशमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण चतुर्दशी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका


योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

पंचमी श्राद्ध

अपराण्ह काळी पंचमी तिथी असल्यामुळेज्यांची श्राद्ध तिथी आश्विन शुक्ल ५ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.

सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळत्यानंतर ३ मुहूर्त संगव काळत्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळत्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट