Saturday, 2 March 2019

दिनविशेष - ५ मार्च २०१९


तिथी
माघ कृष्ण १४ (१९:०७)  
वार
मंगळवार
नक्षत्र
धनिष्ठा (१५:१७)
योग
शिव (१४:३१)
करण
शकुनि (--:--), शकुनि (१९:०७)


रंटति चतुर्दशी

माघ कृष्ण चतुर्दशीला हे व्रत करतात. अरुणोदयाला स्नान करून यमाचे त्यांच्या चौदा नावांनी तर्पण करावे. रंटती नावांची एक वेदी असून तिला कालीचे एक रूप मानतात. बंगालमध्ये या दिवशी कालीची पूजा करतात. तिला रंटती पूजा असे म्हणतात.

मृत्यू योग

१५:१७ नंतर मंगळवारी शततारका नक्षत्र असल्यामुळे मृत्यूयोग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त

हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो. असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो. 
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष रहात नाही.

चतुर्दशी श्राद्ध

अपराण्ह काळी चतुर्दशी तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी माघ कृष्ण १४ असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ:
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
©संकलन: सौ. प्राची शिंदे.

No comments:

Post a Comment