Wednesday, 27 March 2019

दिनविशेष - ३१ मार्च २०१९




तिथी
फाल्गुन कृष्ण ११ (३०:०४)  
वार
रविवार
नक्षत्र
श्रवण (१८:४६)
योग
सिध्द (१९:१५)
करण
बव (१६:४४), बालव (३०:०४)


पापमोचनी (स्मार्त) एकादशी

फाल्गुन कृष्ण एकादशीला पापमोचनी एकादशी असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूंचे पूजन केले जाते व उपवास करतात.

छंदोदेवपूजा

हे एक एक स्त्रीव्रत आहे. फाल्गुन कृष्ण एकादशीला स्त्रिया छंदोदेवाची पूजा करतात. त्याला जलचर प्राण्यांचे मांस, रुचकर खाद्यपदार्थ, केशर, इ. वस्तू समर्पण करतात.
फल - सौभाग्यप्राप्ती व कामनापूर्ती.

रवि रेवती नक्षत्र प्रवेश

२४:५३ ला रवि रेवती नक्षत्रात प्रवेश करीत आहे.

घबाड

१८:४६ नंतर २४:५३ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: उत्तराभाद्रपदा
चंद्र नक्षत्र : धनिष्ठा
तिथी: कृष्ण ११ = १५ + ११ = २६
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २५
२५ x ३ = ७५
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे २६ तिथी मिळवू : ७५ + २६ = १०१
आता ७ ने भागू  १०१ / ७ = १४ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.


दग्ध योग

३०:०४ नंतर रविवारी द्वादशी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


एकादशी श्राद्ध

अपराण्ह काळी एकादशी तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी फाल्गुन कृष्ण ११ असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ:
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
©संकलन: सौ. प्राची शिंदे.

No comments:

Post a Comment