Monday, 25 March 2019

दिनविशेष - २८ मार्च २०१९




तिथी
फाल्गुन कृष्ण ८ (२२:३४)  
वार
गुरुवार
नक्षत्र
मूळ (१०:१०)
योग
वरीयान (१६:४१)
करण
बालव (९:४०), कौलव (२२:३४)

कालाष्टमी

प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी शिव पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.

रूपसत्र

हे एक काम्य व्रत आहे. फाल्गुन कृष्ण अष्टमीला मूळ नक्षत्र असेल, तर त्या दिवशी या व्रताला आरंभ करतात. याचा विधी असा - मूळ नक्षत्र,  त्याचा अधिपती, वरुण,  चंद्र व विष्णू यांची पूजा करून होम करावा. गुरूचा सन्मान करावा. दुसर्‍या दिवशी उपवास करून विष्णुला पायापासून डोक्यापर्यंतच्या निरनिराळ्या अवयवांवर व केसांवर निरनिराळ्या नक्षत्रांची कल्पना करून पूजा करावी. व्रताचा शेवट चैत्र मासातील शुद्ध पक्षाच्या शेवटी करावा. उद्यापनाच्या वेळी श्रीविष्णूची पूजा व
'तद् विष्णौ: परमं पदम्'
या ऋग्वेदीय मंत्राने होम करावा. त्यानंतर गुरूला दक्षिणा द्यावी, ब्राह्मण भोजन घालावे.
फल - स्वर्गप्राप्ती आणि स्वर्गातून परत आल्यावर राज्यप्राप्ती.

शाकाष्टका

फाल्गुन कृष्ण अष्टमीला हे नाव आहे. या दिवशी आठ शाकभाज्या ब्राह्मणाला दान देऊन पितरांचे श्राद्ध करावे, असे सांगितले आहे.


अष्टमी श्राद्ध

अपराण्ह काळी अष्टमी तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी फाल्गुन कृष्ण ८ असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ:
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
©संकलन: सौ. प्राची शिंदे.

No comments:

Post a Comment