तिथी
|
आश्विन शुक्ल ५ (१४:२८)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
अनुराधा (अहोरात्र)
|
योग
|
विष्कंभ (०८:०८)
|
करण
|
बालव (१४:२८), कौलव (२७:३२)
|
घबाड
१४:२८
नंतर घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी
शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: उत्तराफाल्गुनी
चंद्र
नक्षत्र : अनुराधा
तिथी: शुक्ल ६ = ६
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६
x ३ = १८
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ६ = २४
आता
७ ने भागू २४ / ७ = ३ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
पंचरात्रोत्सवारंभ
नवरात्र सुरू होण्यापूर्वी
अशौच आले व महानवमीपूर्वी अशौच संपत असेल तर त्यानंतर सात, पाच, तीन अथवा एक दिवस
जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस नवरात्र करावे. अशौचामुळे वर सांगितल्यामुळे कमी
दिवसांचे नवरात्र करतात. अशा दिवसांचा उल्लेख सप्तरात्रोत्सवारंभ, पंचरात्रोत्सवारंभ, त्रिरात्रोत्सवारंभ
अशा प्रकारे केलेला असतो. अशा दिवशी घटस्थापना करून नवमीपर्यंत नवरात्रीची पूजा
करता येते.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment