Wednesday, 6 September 2017

दिनविशेष - ७ सप्टेंबर २०१७


तिथी
 भाद्रपद कृष्ण १ (११:५२)
वार
 बुधवार
नक्षत्र
 पूर्वाभाद्रपदा (१२:५७)
योग
 शूल (२२:४४)
करण
 कौलव (११:५२), तैतिल (२३:२२)

आरोग्यव्रत

भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून आश्‍विन पौर्णिमेपर्यंत प्रतिदिनी कमलांनी अनिरुद्धमूर्तीची पूजा करावी. उद्यापनाच्या आधी तीन दिवस उपवास, होम करावा व ब्राह्मणभोजन घालावे.
फल - आरोग्य व सौंदर्य यांचा लाभ.

द्वितीया श्राद्ध

अपराण्ह काळी द्वितीया तिथी असल्यामुळेश्राद्धतिथी द्वितीया असेल तर या दिवशी महालय करावा.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.

सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळत्यानंतर ३ मुहूर्त संगव काळत्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळत्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment