Tuesday, 12 September 2017

दिनविशेष - १३ सप्टेंबर २०१७


तिथी
 भाद्रपद कृष्ण ८ (२२:४८)
वार
 बुधवार
नक्षत्र
 रोहिणी (६:२८), मृग (२९:००)
योग
 वज्र (६:५९), सिध्दि (२८:०५)
करण
 बालव (११:५५), कौलव (२२:४८)

कालाष्टमी

प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी शिव पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिवपूजन निषिद्ध मानले जाते.

एक काम्य व्रत.

भाद्रपद कृष्ण अष्टमीला आर्द्रा नक्षत्र असेल त्या दिवशी या व्रताला प्रारंभ करतात. यात उमा-महेश्वराची सुवर्ण मूर्तीला पंचामृताचे स्नान घालून त्यांची पूजा करतात. मग कणकेमध्ये पंचामृत घालून ती मळतात व तिच्यापासून मासा वगैरे प्राण्यांच्या आकाराचे बत्तीस खाद्य पदार्थ करून त्यांचा नैवेद्य दाखवतात. मग त्या सुवर्णमूर्ती व खाद्यपदार्थ एका ब्राह्मणाला दान देतात.
फल- पापनाश; संपत्ती, दीर्घायुष्य व कीर्ती प्राप्ती

मध्याष्टमी श्राद्ध


अष्टमी श्राद्ध

अपराण्ह काळी अष्टमी तिथी असल्यामुळेश्राद्धतिथी अष्टमी असेल तर या दिवशी महालय करावा.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळत्यानंतर ३ मुहूर्त संगव काळत्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळत्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.

रवि उत्तराफाल्गुनी नक्षत्र प्रवेश

१४:३४ ला रवि उत्तराफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करीत आहे.
रविचे मृग नक्षत्र ते हस्त नक्षत्र संक्रमण हा काळ भारतात पावसाळ्याचा मुख्य काळ समाजाला जातो.
रवि नक्षत्र : उत्तराफाल्गुनी
चंद्र नक्षत्र : मृग

वाहन: बेडूक

रवि नक्षत्र प्रवेशाच्या वेळी चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे यावरून वाहन ठरते. सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत मोजावे, त्यास ९ ने भागून बाकी किती राहते त्याप्रमाणे वाहन ठरते.
बाकी
वाहन
पर्जन्य वृष्टीचे स्वरूप
घोडा
पर्वतावर पाऊस पडेल
कोल्हा
पाऊस पडणार नाही.
बेडूक
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
मेंढा
पाऊस पडणार नाही.
मोर
अल्पवृष्टी होईल.
उंदीर
अल्पवृष्टी होईल.
महिष
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
गाढव
अल्पवृष्टी होईल.
० / ९
हत्ती
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
रवि नक्षत्र : उत्तराफाल्गुनी
चंद्र नक्षत्र : मृग
अंतर : २१
२१ ला ९ ने भागले असता बाकी राहते ३. म्हणून वाहन बेडूक आहे. याचाच अर्थ रवि उत्तराफाल्गुनी नक्षत्रात असताना भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.

नक्षत्रसंज्ञा : सूर्य-सूर्य

सूर्य नक्षत्रे
रोहिणी, मृग, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, जेष्ठा, मूळ, धनिष्ठा, शततारका, उत्तराभाद्रपदा
चंद्र नक्षत्रे
अश्विनी, भरणी, कृत्तिका, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, पूर्वा भाद्रपदा, रेवती

दोन्ही सूर्य नक्षत्रे
 वारा सुटेल
दोन्ही चंद्र नक्षत्रे
 पाऊस पडणार नाही
एक चंद्र व दुसरे सूर्य
 पाऊस पडेल
रवि नक्षत्र : उत्तराफाल्गुनी = सूर्य नक्षत्र
चंद्र नक्षत्र : मृग =  सूर्य नक्षत्र
दोन्ही सूर्य नक्षत्र आहे. याचा अर्थ रवि उत्तराफाल्गुनी नक्षत्रात असताना वारा सुटेल.

स्त्री-पुरुष-नपुंसक नक्षत्रे : स्त्री पुरुष

स्त्री नक्षत्रे
 आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती
पुरुष नक्षत्रे
 अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा ,उत्तराभाद्रपदा, रेवती
नपुंसक नक्षत्रे
 विशखा, अनुराधा, जेष्ठा

सूर्य नक्षत्र स्त्री संज्ञक व चंद्र नक्षत्र नपुंसक : वारे सुटून वृष्टी मध्यम होईल
स्त्री पुरुष असा योग असेल तर: वृष्टी समाधान कारक होईल.

रवि नक्षत्र : उत्तराफाल्गुनी = स्त्री नक्षत्र
चंद्र नक्षत्र : मृग = पुरुष नक्षत्र
सूर्य नक्षत्र स्त्री संज्ञक व चंद्र नक्षत्र पुरुष संज्ञक आहे त्यामुळे  रवि उत्तराफाल्गुनी नक्षत्रात असताना समाधानकारक पर्जन्यवृष्टी होईल.


पावसाचा अंदाज घेताना या बरोबरच रविच्या नक्षत्र प्रवेशाची कुंडली मांडून त्यातील ग्रह स्थिती लक्षात घेणे देखील अत्यावश्यक आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment