Sunday, 17 September 2017

दिनविशेष - १९ सप्टेंबर २०१७


तिथी
 भाद्रपद कृष्ण १४ (११:५३)
वार
 मंगळवार
नक्षत्र
 पूर्वाफाल्गुनी (२३:०१)
योग
 साध्य (१२:४४)
करण
 शकुनि (११:५३), चतुष्पाद (२३:२३)

सर्वपित्री अमावास्या

या भाद्रपद अमावस्येदिवशी सर्व पितरांचे श्राद्ध करतात.

दर्श अमावास्या

अपराण्हकाली जास्त मानाने असणाऱ्या अमावास्येलाच "दर्श अमावास्या" असे म्हणतात. अमावस्या ही पर्वतिथी आहे. यावेळी जप,तप, दान, अथवा व्रत केले असता अधिक फलप्राप्ती होते. या तिथीस श्राद्ध केले असता पितर तृप्त होतात.

भादवी पोळा

काही भागात श्रावणी, तर काही भागात भादवी (भाद्रपद महिन्यातील) पोळा सण साजरा होतो. पोळा सणात बैल' हा केंद्रबिंदू असला, तरी त्याचा आशय व्यापक अर्थाने पशुधनाबाबत आहे. वर्षभर आपल्या कारभाऱ्याच्या बरोबरीने मेहनत करणारा, त्याच्या सुख-दुःखाचा साथीदार असलेला बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र. या मित्राने आपल्या कुटुंबासाठी केलेल्या ऋणातून उतराई होण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो.

कुशग्रहणी

भाद्रपद अमावास्येचे नाव. या दिवशी दर्भ कापून धर्मकृत्यांसाठी त्यांचा संचय करावा. असे सांगितले आहे.

अमावास्या श्राद्ध

अपराण्ह काळी अमावास्या तिथी असल्यामुळेश्राद्धतिथी अमावास्या असेल तर या दिवशी महालय करावा.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळत्यानंतर ३ मुहूर्त संगव काळत्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळत्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.

अन्वाधान

अग्नी हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ष्टिच्या च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment