Wednesday, 20 September 2017

दिनविशेष - २२ सप्टेंबर २०१७


तिथी
 आश्विन शुक्ल २ (१०:४२)
वार
 शुक्रवार
नक्षत्र
 चित्रा (२४:३८)
योग
 ब्रह्मा (८:३१)
करण
 कौलव (१०:४२), तैतिल (२२:५८)

तुलायन

२५:३१ ला रवि सायन तूळ राशीत प्रवेश करीत आहे.

मुस्लिम मोहरम मासारंभ

मुस्लीम कालगणनेच्या मोहरम या महिन्याची सुरवात होत आहे.

हिजरी सन १४३९

हिजरी सन १४३९ आरंभ होत आहे.
हा सण मुळचा अरबस्थानातला आहे. मुसलमानांच्या अंमलापासून तो या देशात आला. मुसलमानी धर्म संस्थापक महंमद पैगंबर हा १५ जुलै ६२२ रोजी, (श्रावण शुक्ल १ गुरवारी रात्री) मक्केहून मदिनेला गेला. त्यावेळपासून हा सण सुरु झाला. याला रात्रीपासून सुरवात झाली. याच्या वाराचा आरंभ संध्याकाळपासून होतो. (उदाहरणार्थ आपल्या गुरुवारच्या संध्याकाळपासून ते शुक्रवार संध्याकाळपर्यंत मुसलमानी पद्धतीत शुक्रवार असतो.)
शुक्ल पक्षात चंद्र दर्शन झाल्यानंतरच्या रात्रीपासून नवीन महिन्याला सुरवात होते. म्हणजे यांचे महिने केवळ चांद्र आहेत. या महिन्यातील दिवसांना पहिला चंद्र, दुसरा चंद्र अशी नवे आहेत.
यांच्या बारा महिन्यांची नावे अशी:
१)      मोहरम
२)      सप्फर
३)      राबिलावल
४)      रबिलाखर
५)      जमादिलावल
६)      जमादिलाखर
७)      रज्जब
८)      साबान
९)      रमजान
१०)  सव्वाल
११)  जिल्काद
१२)  जिल्हेज

तृतीया श्राद्ध

अपराण्ह काळी तृतीया तिथी असल्यामुळेज्यांची श्राद्ध तिथी आश्विन शुक्ल ३ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळत्यानंतर ३ मुहूर्त संगव काळत्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळत्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment