Friday, 15 September 2017

दिनविशेष - १६ सप्टेंबर २०१७


तिथी
 भाद्रपद कृष्ण ११ (१६:३१)
वार
 शनिवार
नक्षत्र
 पुष्य (२५:०५)
योग
 परिघ (१९:४३)
करण
 बालव (१६:३१), कौलव (२७:३५)

इंदिरा एकादशी / कृष्णैकादशी

या एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात. हे व्रत केल्याने सर्व पापे दूर होतात व पितरांचा उद्धार होतो. त्यासाठी सकाळी स्नान करून उपवास करावा आणि हरिचिंतनात रात्र घालवावी. जर या दिवशी पितृश्राद्ध-तिथी असेल तर व उपवासामुळे श्राद्धीय अन्न ग्रहण करण्यास संकोच वाटेल तर त्याचा वास घेऊन ते गाईस घालावे आणि पारणे केल्यावर भोजन करावे.

रवि कन्या राशीत प्रवेश

२४:४० ला रवि कन्या राशीत प्रवेश करीत आहे.
रवि संक्रमणाच्या वेळी,  कन्या राशीसाठी संक्रमणाआधी १६ घटिका पुण्यकाळ असतो. मात्र यामध्ये रात्रीची वेळ घेत नाहीत. पुण्याकालात स्नान, दान इ. गोष्टी अधिक शुभ मानल्या आहेत. म्हणून पुण्यकाल रविवार दिनांक १२ रोजी सूर्योदय ते १२:३३ असा आहे.
सामुदायिक मुहूर्त ३० म्हणजे साम्यार्घ आहेत. रविच्या राशी संक्रमाणाच्या वेळी असणाऱ्या चंद्र नक्षत्रावरून ३ प्रकारचे सामुदायिक मुहूर्त होतात. ते व त्यांची फळे पुढील प्रमाणे:
·         १५ : महर्घ / जघन्य : फळ = तेजी
·         ३० : साम्यार्घ : फळ = सम
·         ४५ : समर्घ : फळ = मंदी

एकादशी श्राद्ध

अपराण्ह काळी एकादशी तिथी असल्यामुळेश्राद्धतिथी एकादशी असेल तर या दिवशी महालय करावा.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळत्यानंतर ३ मुहूर्त संगव काळत्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळत्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment