तिथी
|
भाद्रपद कृष्ण २ (१०:४४)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
उत्तराभाद्रपदा (१२:३१)
|
योग
|
गंड (२०:३५)
|
करण
|
गरज (१०:४४), वणिज (२२:०१)
|
बृहद् गौरी (डोरली व्रत)
एक काम्य
स्त्रीव्रत. भाद्रपद कृष्ण तृतीया ही व्रताची तिथी होय. याचा विधी असा -
फळाफुलांनी युक्त असा बृहती (रिंगणी) चा वेल मुळासकट आणून तो वेळूच्या वेदीत
पुरतात. त्याच्यापुढे पंचसूत्री दोरा ठेवतात. मग रात्री चंद्रोदय झाल्यानंतर पाच
सुवासिनींसह त्या वेलाला गौरी मानून, त्याची पूजा करतात. पूजेनंतर तो दोरा गळ्यात
बांधून चंद्राची पूजा करतात. त्याला कणकेच्या लाडवांचा नैवेद्य दाखवतात. त्यांतले
अर्धे लाडू ब्राह्मणाला देतात. तसेच, कणकेची रिंगणी एवढी फळे करून त्याची वायने
देतात.
पाच वर्षे
उद्यापन करून त्याचे उद्यापन करतात. त्यावेळी चौसष्ट बियांनी युक्त असे रिंगणीएवढे
सुवर्णफल तयार करून ते गौरीला अर्पण करतात. ब्राह्मण-सुवासिनींना भोजन घालतात.
कजरी तृतीया
भाद्रपद वद्य
तृतीयेस उत्तर प्रदेशातल्या स्त्रिया कजरीची पूजा करतात. या दिवशी गहू, चणे व तांदूळ
यांच्या पिठात तूप, साखर वगैरे घालून त्याचे गोड पदार्थ बनवितात.
म्हणून या व्रताला हे लोक सातुडी (सत्तू = पीठ ) तीज किंवा सतवा वीज असे म्हणतात.
उत्तर प्रदेशात
या दिवशी स्त्रिया झाडाला झूले टांगतात व त्यावर झोके घेत कजरीची गीते गातात.
अनंत तृतीया
भाद्रपद, वैशाख किंवा मार्गशीर्ष या
मासांच्या तृतीयेपासून एक वर्षपर्यंत याचा व्रतकाल आहे. व्रताची देवता गौरी असून
प्रत्येक मासी वेगवेगळ्या फुलांनी तिची पूजा करतात.
तृतीया श्राद्ध
अपराण्ह काळी तृतीया तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी तृतीया असेल तर या दिवशी महालय करावा.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी
म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त
मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने
दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व
कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment