तिथी
|
माघ कृष्ण ८ (१४:१८)
|
वार
|
रविवार
|
नक्षत्र
|
अनुराधा (२२:०६)
|
योग
|
व्याघ्रात (२१:१५)
|
करण
|
तैतिल (२७:३२)
|
अन्वाष्टका श्राद्ध
धर्मसिंधु नुसार षण्णवती म्हणजे एकूण ९६ श्राद्धे सांगितली
आहेत. ती पुढीलप्रमाणे :
अमावास्या
|
१२
|
युगादि
|
४
|
मन्वादि
|
१४
|
संक्रांति
|
१२
|
वैधृती
|
१२
|
व्यतिपात
|
१२
|
महालय
|
१५
|
अष्टका
|
५
|
अन्वष्टका
|
५
|
पूर्वेद्यु
|
५
|
एकूण
|
९६
|
छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे)
छत्रपती शिवाजीमहाराज जयंती (तारखेप्रमाणे)
१९ फेब्रुवारी १६३० हा दिवस शिवाजी महाराजाचा जन्म दिवस (तारखेनुसार) म्हणून
साजरा केला जातो.
भारतात इंग्रज येण्यापूर्वी तिथीनुसार व्यवहार होत असत. इंग्रजी राज्य आल्यावर
ग्रेगेरिअन कॅलेंडरप्रमाणे व्यवहार होऊ लागले.
आज ज्या ग्रेगेरिअन कॅलेंडरने शिवाजीच्या जन्माची १९ फेब्रुवारी ही तारीख
निश्चित केली आहे, ते कॅलेंडर शिवाजीच्या वेळेला युरोपातसुद्धा प्रचलित नव्हते. इंग्रजांनी
ग्रेगेरियन कॅलेंडर १७५२ साली स्वीकारले, तोपर्यंत ज्युलियन कॅलेंडर अधिकृत होते. ज्युलिअन कालगणना व ग्रेगेरिअन
कालगणना यांच्यात १७०० सालपर्यंत १० दिवसांचा तर १७०० सालापासून पुढे ११ दिवसांचा
फरक येतो. (ज्युलियन कॅलेंडर पुढे गेले होते.) त्यामुळे ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार
निर्धारित १९ फेब्रुवारी ही तारीख १० - ११ दिवसांनी चुकते. कोणती कालगणना
शिवाजीच्या जन्मावेळी प्रचलित होती त्यानुसारमुळे शिवाजी जयंती तिथीनुसार साजरी
व्हावी असे काही जणांना वाटते.
शिवाजींचा जन्म १६२७ साली झाला अशी जेव्हा मान्यता होती तेव्हा जयंतीची तिथी
वैशाख शुद्ध तृतीया येत असे. जेव्हा जन्मसाल १६३० नक्की झाले तेव्हा तिथी फाल्गुन
वद्य तृतीया येऊ लागली. शिवाजीच्या जन्मावेळी जर ग्रेगेरियन कॅलेंडर असते तर १६३०
सालची फाल्गुन वद्य तृतीया १९ फेब्रुवारीला आली असती. म्हणून, २००१ सालापासून १९
फेब्रुवारी ह्या तारखेला सरकारी शिवजयंती साजरी होते.
रविचा शततारका नक्षत्रात प्रवेश
११:०८ ला रवि शततारका
नक्षत्रात प्रवेश करीत आहे.
मृत्यू योग
२२:०६ पर्यंत रविवारी
अनुराधा नक्षत्र असल्यामुळे मृत्यूयोग होत आहे.
हा
योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
|
सोमवार – उत्तराषाढा
|
मंगळवार – शततारका
|
बुधवार – अश्विनी
|
गुरुवार – मृग
|
शुक्रवार – आश्लेषा
|
शनिवार – हस्त
|
|
हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो.
असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो.
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो.
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष
रहात नाही.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment