तिथी
|
माघ कृष्ण १ (२९:०५)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
आश्लेषा (८:५४)
|
योग
|
शोभन (२२:२३)
|
करण
|
बालव (१७:३०)
|
गुरुप्रतिपदा
माघ
कृष्ण प्रतिपदेला गुरुप्रतीपादा असे म्हणतात.
हा दिवस दत्तभक्तांसाठी विशेष महत्वाचा असतो.
श्रीनृसिंहसरस्वती हे श्रीपाद वल्लभ यांनंतरचे श्रीदत्तात्रेयांचे दुसरे
पूर्णावतार मानले जातात. नरसोबाची वाडी, औदुंबर, गाणगापूर येथे त्यांच्या पादुका असून लाखो भक्त सेवेसाठी तेथे जातात.
श्रीगुरुचरित्र या ओवीबद्ध ग्रंथात त्यांच्या लीला वर्णिल्या असून हा ग्रंथ
दत्तभक्तांचा 'वेद' मानला जातो. त्यांच्यामुळे महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा मोठा प्रसार झाला.
माघ कृष्ण प्रतिपदेला श्री महाराज कर्दळीवन येथे गुप्त झाले. या दिवशी आपले
अवतार कार्य संपवून श्री नृसिंहसरस्वती दत्त महाराजांनी कर्दळीवन येथे जाण्यासाठी
आपल्या प्रिय शिष्यांना निरोप दिला व अंतर्धान पावले.
शिशिर ऋतु माघमासीं । असितपक्ष
प्रतिपदेसी ।
शुक्रवारीं पुण्यदिवसीं । श्रीगुरु
बैसले निजानंदीं ॥॥
श्रीगुरु म्हणती शिष्यांसी । जातों आम्ही निज मठासी ।
पावतां खूण तुम्हांसी । प्रसादपुष्पें पाठवितों ॥॥
गाणगापूर यात्रा ४ दिवस
श्री
क्षेत्र गाणगापूर येथील ४ दिवसाची यात्रा आरंभ होत आहे.
इष्टि
इष्टि म्हणजे
यज्ञ.
यज्ञ
संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि
म्हणतात.
प्रतिपदा श्राद्ध
अपराण्ह काळी प्रतिपदा तिथी
असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी माघ कृष्ण १ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि
अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त
मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन
वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त
प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ,
त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने
दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना
प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment