तिथी
|
माघ शुक्ल ६ (२४:४३)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
रेवती (२१:११)
|
योग
|
साध्य (२६:४२)
|
करण
|
कौलव (१३:३३)
|
दारिद्र्यहर षष्ठी
माघ शुक्ल
षष्ठीला या व्रताचा आरंभ करून प्रत्येक षष्ठीला एकभुक्त, नक्त, अयाचित अथवा उपवास करून ब्राह्मणभोजन घालावे आणि वाटीत दूध, तूप,
भात आणि साखर घालून
प्रत्येक षष्ठीला वर्षभर दान करावे म्हणजे त्याच्या कुळावरील दारिद्र्य दूर होईल.
मंदारषष्ठी
हे व्रत तीन
दिवसाचे आहे. यासाठी माघ शुक्ल पंचमी दिवशी संपूर्ण कामनारहित होऊन, जितेंद्रिय राहून एकभुक्त, तेही थोडेसे खाऊन राहावे. षष्ठी दिवशी
प्रात:स्नानादि नित्यकर्मे केल्यानंतर ब्राह्मणांची आज्ञा घेऊन व्रत करावे व
रात्री फक्त मंदारपुष्प भक्षण करून उपवास करावा. त्याप्रमाणे सप्तमी दिवशी सकाळी
ब्राह्मणपूजन करून मंदार (रुई) -वृक्षाची आठ फुले आणावीत व तांब्याच्या पात्रात
तिळांचे अष्टदल कमळ काढावे. त्याच्या प्रत्येक पाकळीवर एकएक फूल ठेवावे व मध्यभागी
सोन्याची सूर्यमूर्ती स्थापावी आणि
'भास्कराय नम:'
म्हणून पूर्व
दिशेकडील,
'सूर्याय नम:'
म्हणून
अग्नेयेकडील,
सूर्याय नम:'
म्हणून
दक्षिणेकडील,
'यज्ञेशाय नम:'
म्हणून
नैऋत्येकडील,
'वसुधाम्ने नम:'
म्हणुन पश्चिमेकडील,
'चंडभानवे नम:'
म्हणुन
वायव्येकडील,
'कृष्णाय नम:'
म्हणुन
उत्तरेकडील आणि
'श्रीकृष्णाय नम:'
म्हणून
ईशान्येकडील अर्क-पुष्पांची स्थापना आणि पूजा करावी. आणि कमल-मध्यातील सूर्यदेवाची
'सूर्याय नम:' म्हणून पूजा करावी. तेल आणि मीठवर्जित भोजन
करावे. याप्रमाणे प्रतिज्ञापूर्वक महिनेच्या महिने प्रत्येक सप्तमीला वर्षपर्यंत
व्रत करून समाप्ती दिवशी घटावर लाल सूर्यमूर्ती स्थापन करून पूजा करावी.
'नमो मंदारनाथाय
मंदारभवनाय च ।
त्वं के
तारयस्वास्मानस्मात् संसारसागरात्'
अशी प्रार्थना
करून सूर्यमूर्ती विद्वान ब्राह्मणाला दान द्यावी. यामुळे सर्व पापांचा नाश होऊन
स्वर्गप्राप्ती होते.
नंदादी विधी
माघ शुक्ल
षष्ठीला रविवार असेल तर 'नंदा' असे म्हणतात. या
दिवशी नक्त करून सूर्यमुर्तीला तुपाने स्नान घालणे आणि अगस्तीची फुले वाहून
त्याची पूजा करणे असा विधी आहे. उद्यापनाच्या वेळी ब्राह्मणांना घारग्याचे भोजन
घालतात.
फल - दु:ख व दारिद्र्य यांचा नाश; धन, सुख, संतती व सूर्यलोक यांची
प्राप्ती.
घबाड
२१:११ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग
आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: श्रवण
चंद्र
नक्षत्र : रेवती
तिथी: शुक्ल ६ = ६
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६
x ३ = १८
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ६ = २४
आता
७ ने भागू २४ / ७ = ३ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
दग्ध योग
२४:४३ पर्यंत गुरुवारी
षष्ठी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार
यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती
मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
षष्ठी श्राद्ध
अपराण्ह काळी षष्ठी तिथी
असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी माघ शुक्ल ६ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि
अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त
मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन
वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त
प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ,
त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने
दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व
कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment