Tuesday, 13 June 2017

दिनविशेष - १४ जून २०१७



तिथी
 जेष्ठ कृष्ण ५ (२८:२२)   
वार
 मंगळवार
नक्षत्र
 श्रवण (१५:३३)
योग
 वैधृति (२८:३२)
करण
 कौलव (१५:४७), तैतिल (२८:२२)


रवि मिथुन राशीत प्रवेश

२९:३२ ला रवि मिथुन राशीत (निरयन) प्रवेश करीत आहे.
रवि संक्रमणाच्या वेळी,  मिथुन राशीसाठी संक्रमणानंतर १६ घटिका पुण्यकाळ असतो. मात्र यामध्ये रात्रीची वेळ घेत नाहीत. पुण्याकालात स्नान, दान इ. गोष्टी अधिक शुभ मानल्या आहेत. म्हणून पुण्यकाल दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ तारखेस सुर्योदय ते १२:३९ असा आहे.
सामुदायिक मुहूर्त ३० म्हणजे साम्यार्घ आहेत. रविच्या राशी संक्रमाणाच्या वेळी असणाऱ्या चंद्र नक्षत्रावरून ३ प्रकारचे सामुदायिक मुहूर्त होतात. ते व त्यांची फळे पुढील प्रमाणे:
·         १५ : महर्घ / जघन्य : फळ = तेजी
·         ३० : साम्यार्घ : फळ = सम
·         ४५ : समर्घ : फळ = मंदी

पंचमी श्राद्ध

अपराण्ह काळी पंचमी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी जेष्ठ कृष्ण ५ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment