तिथी
|
जेष्ठ कृष्ण १२ (१९:१५)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
भरणी (१३:२७)
|
योग
|
सुकर्मा (१४:२३)
|
करण
|
कौलव (८:५५), तैतिल (१९:१५), गरज (२९:२९)
|
अंतरराष्ट्रीय योग दिवस
अंतरराष्ट्रीय
योग दिवस २१ जून रोजी साजरा केला जातो. हा
उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा / दीर्घ दिवस असतो. आणि योग देखील मनुष्याला दीर्घ
आयुष्य प्रदान करतो. पहिल्यांदा हा दिवस २१ जून २०१५ रोजी साजरा करण्यात आला.
भारताचे तत्कालीन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसभेत आवाहन
केल्यांनतर ११ डिसेंबर २०१४ रोजी १९३ सदस्यांनी या प्रस्तावाला मजूरी दिली.
योगसाधना करून हा दिवस
साजरा केला जातो.
प्रदोष
सूर्यास्तानंतर
पुढे ३ मुहूर्त (म्हणजे मध्यम मानाने
साधारण २ तास २४ मिनिटे ) प्रदोष काळ असतो.
प्रत्येक
चांद्र मासात प्रदोष काळी जेव्हा त्रयोदशी असेल त्या दिवशी प्रदोष निमित्त उपास
करतात.
‘कामनाभेद ' हा या व्रताचा विशेष
आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला हे व्रत करावे. याप्रमाणे एक
वर्षभर करावे. व्रतादिवशी प्रात: स्नान करुन
'मम पुत्रादिप्राप्तिकामनया
प्रदोषव्रतमहं करिष्ये'
इ. संकल्प करून व्रतारंभ करावा. सायंकाळी पुन्हा स्नान करावे. श्रीशंकराचे
पुढे बसून वेदपाठी ब्राह्मणाज्ञेप्रमाणे पुढील मंत्राने प्रार्थना करावी व
षोड्शोपचारे पूजा करावी.
भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥
उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे । ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥
भाजलेले सातूचे पीठ , तूप व साखरेचा नैवेद्य अर्पण
करावा. याप्रमाणे करून तेथेच आठ दिशांना आठ दिवे प्रज्वलित करावेत व प्रत्येक दिवा
लावताना आठ वेळा नमस्कार करावा.
'धर्मस्त्वं वृष रूपेण
जगदानन्दकारक।
अष्टमूर्तैरधिष्ठानं अथः पाहि सनातन ।'
या मंत्राने नंदिकेश्वराला पाणी दुर्वा आदि देऊन त्याची पूजा करावी व त्याला
स्पर्श करुन पुढील मंत्राने शंकर, पार्वती आणि नंदिकेश्वराची
प्रार्थना करावी.
ऋणरोगादि दारिद्र्यम ये चान्ये चापम्रुत्यव: !
भय क्लेश मनस्ताप: नश्यनंतु मम सर्वदा !!
"
( कर्ज,रोग,गरिबी,अपम्रूतू,भय, त्रास ईत्यादि मनस्ताप माझे कायमचे नाहिशे होवोत.)
हे व्रत विशेषत: स्त्रियांनी करण्याचे आहे. नंदीच्या शेपूट व शिंगे आदींच्या
स्पर्शाने अभीष्टसिद्धी होते.
Ø सोमवार: शांतीरक्षणासाठी सोम प्रदोष करावा.
Ø मंगळवार: ऋणमुक्त होण्यासाठी
भौम प्रदोष करावा.
Ø शुक्रवार: सौभाग्य किंवा स्त्री-समृद्धीची
इच्छा असेल तर शुक्रवारी हे व्रत करावे.
Ø शनिवार: पुत्र प्राप्तीसाठी
शनिप्रदोष वर्षभर किंवा फलप्राप्ती होई पर्यंत करावा.
Ø रविवार: आयुर्दायासाठी
अर्कप्रदोष हे व्रत करावे.
दक्षिणायनारंभ
अयन म्हणजे जाणे. चलन होणे.
सूर्य दररोज पूर्व
क्षितिजावर एकाच बिंदूत उगवलेला दिसत नाही. तो सुमारे सहा महिने उत्तरेकडे व
सुमारे सहा महिने दक्षिणेकडे उगवत असलेला दिसतो.
सूर्याभोवती परिभ्रमण
करणाऱ्या पृथ्वीचा आस २३|| अंशाने कलता आहे. या कारणामुळे सूर्याचा दैनिक मार्ग
उत्तर व दक्षिण असा सरकत जातो. पूर्व बिंदूच्या उत्तरेस २३|| अंशापर्यंत सरकत
जाण्याची मर्यादा सूर्याने गाठली कि २१ जून पासून तो दक्षिणेस येण्यास सुरवात
होते. त्यास दक्षिणायन म्हणतात.
या दिवशी उत्तर गोलार्धात
सर्वात मोठा दिवस असतो व दक्षिण गोलार्धातील सर्वात लहान दिवस. यांनतर हळू हळू
उत्तर गोलार्धात दिनमान कमी कमी होऊ लागते. तर या उलट स्थिती दक्षिण गोलार्धात
अनुभवास येते.
रवि आर्द्रा नक्षत्र प्रवेश
२९:०८ ला रवि मृग नक्षत्रात प्रवेश करत आहे.
रविचे मृग नक्षत्र ते हस्त नक्षत्र संक्रमण हा काळ भारतात पावसाळ्याचा मुख्य काळ
समाजाला जातो.
रवि
चे नक्षत्र :
आर्द्रा
चंद्र
नक्षत्र: कृत्तिका
वाहन महिष/ म्हैस
रवि
नक्षत्र प्रवेशाच्या वेळी चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे यावरून वाहन ठरते. सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत मोजावे, त्यास ९ ने भागून बाकी किती राहते
त्याप्रमाणे वाहन ठरते.
बाकी
|
वाहन
|
पर्जन्य वृष्टीचे स्वरूप
|
१
|
घोडा
|
पर्वतावर पाऊस पडेल
|
२
|
कोल्हा
|
पाऊस पडणार नाही.
|
३
|
बेडूक
|
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
|
४
|
मेंढा
|
पाऊस पडणार नाही.
|
५
|
मोर
|
अल्पवृष्टी होईल.
|
६
|
उंदीर
|
अल्पवृष्टी होईल.
|
७
|
महिष
|
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
|
८
|
गाढव
|
अल्पवृष्टी होईल.
|
० / ९
|
हत्ती
|
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
|
रवि
चे नक्षत्र :
आर्द्रा
चंद्र
नक्षत्र: कृत्तिका
अंतर
: २५
२५
ला ९ ने भागले असता बाकी राहते ७. म्हणून वाहन महिष / म्हैस आहे. याचाच अर्थ रवि
आर्द्रा नक्षत्रात असताना भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
नक्षत्रसंज्ञा : चंद्र-चंद्र
सूर्य नक्षत्रे
|
रोहिणी, मृग, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा,
जेष्ठा, मूळ, धनिष्ठा, शततारका, उत्तराभाद्रपदा
|
चंद्र नक्षत्रे
|
अश्विनी, भरणी, कृत्तिका, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा,
पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, पूर्वा भाद्रपदा, रेवती
|
दोन्ही सूर्य नक्षत्रे
|
वारा सुटेल
|
दोन्ही चंद्र नक्षत्रे
|
पाऊस पडणार नाही
|
एक चंद्र व दुसरे सूर्य
|
पाऊस पडेल
|
रवि
चे नक्षत्र :
आर्द्रा = चंद्र नक्षत्र
चंद्र
नक्षत्र: कृत्तिका = चंद्र
नक्षत्र
दोन्ही चंद्र नक्षत्रे आहेत. याचा अर्थ रवि आर्द्रा नक्षत्रात फारसा पाऊस पडणार नाही.
स्त्री-पुरुष-नपुंसक नक्षत्रे : स्त्री पुरुष
स्त्री नक्षत्रे
|
आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा,
मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती
|
पुरुष नक्षत्रे
|
अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी,
मृग, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा
,उत्तराभाद्रपदा, रेवती
|
नपुंसक नक्षत्रे
|
विशखा, अनुराधा, जेष्ठा
|
सूर्य
नक्षत्र स्त्री संज्ञक व चंद्र नक्षत्र नपुंसक : वारे सुटून वृष्टी मध्यम होईल
स्त्री
पुरुष असा योग असेल तर: वृष्टी समाधान कारक होईल.
रवि
चे नक्षत्र :
आर्द्रा = स्त्री नक्षत्र
चंद्र
नक्षत्र: कृत्तिका = पुरुष नक्षत्र
एक
पुरुष नक्षत्र तर दुसरे स्त्री नक्षत्र आहे. त्यामुळे रवि आर्द्रा नक्षत्रात
असताना समाधानकारक पर्जन्यवृष्टी होईल.
पावसाचा
अंदाज घेताना या बरोबरच रविच्या नक्षत्र प्रवेशाची कुंडली मांडून त्यातील ग्रह
स्थिती लक्षात घेणे देखील अत्यावश्यक आहे.
कर्कायन
९:५३ ला रवि सायन कर्क राशीत प्रवेश करत
आहे.
याचा पुण्यकाल सूर्योदय ते
९:५ असा आहे.
सौर वर्षाऋतु प्रारंभ
कालगणनेच्या सौर
पद्धतीनुसार वर्षा ऋतुचा आरंभ होत आहे.
द्वादशी श्राद्ध
अपराण्ह काळी द्वादशी
तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी जेष्ठ कृष्ण १२ आहे
त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment