तिथी
|
जेष्ठ शुक्ल ९ (६:५१)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
उत्तराफाल्गुनी (१३:२६)
|
योग
|
सिद्धि (२१:३०)
|
करण
|
कौलव (६:१५), तैतिल (१९:२३)
|
महेश नवमी
जेष्ठ
शुद्ध नवमीस महेश नवमी असेही म्हणतात.
यादिवशी भगवान
श्री शंकर आणि मत पार्वती यांचे पूजन केले जाते. महेश्वरी समाजाची निर्मिती या
दिवसापासून झाली अशी मान्यता आहे. त्यामुळे महेश्वरी समाजात हा उत्सव मोठ्या
प्रमाणात साजरा केला जातो.
महेश नवमी कथा
माहेश्वरी
समाजाचे पूर्वज क्षत्रिय वंशाचे होते. एकदा शिकार करीत असताना त्यांच्या
शिकारीमुळे ऋषींच्या यज्ञात विग्घ्न उत्त्पन्न झाले. त्यामुळे त्या ऋषींनी शाप
दिला कि "तुमच्या वंशाचा नाश होईल". माहेश्वरी समाजाला हा शाप लागला
होता. मात्र जेष्ठ शुक्ल नवमीच्या दिवशी भगवान श्री शाकारांच्या कृपेने ते
शापमुक्त झाले तर झालेच आणि शंकरांनी या समाजाला आपले नाव पण दिले. तेव्हापासून हा
समाज "महेश्वरी" या नावाने ओळखला जातो. भगवान श्री शंकरांच्या
आज्ञेनुसार माहेश्वरी समाजाने क्षत्रिय कर्म सोडून वैश्य कर्म करायला सुरवात केली.
उमाब्राह्मणी
ज्येष्ठ शुक्ल
नवमी दिवशी उपवास करावा. ब्राह्मणी नावाने ख्यात गौरवर्णीय पार्वतीची भक्तिभावाने
पूजा करावी. ब्राह्मण व ब्राह्मणकन्येला दूधभाताचे जेवण घालावे व रात्री स्वतः
भोजन करावे.
मृत्यू योग
१३:२६ नंतर शनिवारी हस्त
नक्षत्र असल्यामुळे मृत्यू योग होत आहे.
हा
योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
|
सोमवार – उत्तराषाढा
|
मंगळवार – शततारका
|
बुधवार – अश्विनी
|
गुरुवार – मृग
|
शुक्रवार – आश्लेषा
|
शनिवार – हस्त
|
|
हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो.
असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो.
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो.
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष
रहात नाही.
यमघंट योग
१३:२६ नंतर शनिवारी हस्त
नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे.
हा
योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज
सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
|
सोमवार – विशाखा
|
मंगळवार – आर्द्रा
|
बुधवार – मूळ
|
गुरुवार – कृत्तिका
|
शुक्रवार – रोहिणी
|
शनिवार – हस्त
|
|
यमघंट योगावर जन्म झाल्यास
बालकाला कष्ट होतात. (शांती केल्यास हे कष्ट नष्ट होतात.)
यमघंट योगावर प्रयाण
केले असता मृत्यू
ग्रहप्रवेश केला असता
कुलक्षय
देवास्थापाना केली असता
मृत्यू हि फळे मिळतात.
याशिवाय
चैत्र शुक्ल पक्ष, शुक्ल ५,
गुरुवार व कृत्तिका नक्षत्र असल्यास (भरणी नक्षत्राची ९ घटिका २० पळे संपल्यावर
पुढे) देखील यमघंट योग होतो.
दग्ध योग
६:५१ पर्यंत शनिवारी नवमी
तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार
यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती
मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
|
दशमी श्राद्ध
अपराण्ह काळी दशमी
तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी जेष्ठ शुक्ल १० आहे
त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment