तिथी
|
जेष्ठ कृष्ण ११ (२२:२९)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
अश्विनी (१५:४४)
|
योग
|
अतिगंड (१८:०१)
|
करण
|
बव (११:५५), बालव (२२:२९)
|
योगिनी एकादशी
ज्येष्ठ कृष्ण एकादशी दिवशी
प्रातःस्नानादी नित्यकर्मे आचरुन
'मम सकल पापक्षयपूर्वक कुष्ठादिरोगनिवृत्तिकामनया
योगिन्येकादशीव्रतमहं करिष्ये ।'
असा संकल्प सोडून
श्रिपुंडरीकाक्ष भगवंताचे (विष्णूचे) पूजन करावे. त्याच्या चरणोदकाने सर्वांगावर
मार्जन करावे आणि उपवास करुन रात्री जागरण करावे, म्हणजे कुष्ठादी सर्व
रोगांपासून मुक्त होतो.
अमृत योग
१५:४४ पर्यंत मंगळवारी
अश्विनी नक्षत्र असल्यामुळे होणारा गृह प्रवेशासाठी वर्ज असणारा अमृतसिद्धी योग
होत आहे.
घबाड
१५:४४ नंतर २२:२९ पर्यंत घबाड
योग आहे. हा प्रयाणासाठी
शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: मृग
चंद्र
नक्षत्र : भरणी
तिथी: कृष्ण ११ = १५ + ११ = २६
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २५
२५
x ३ = ७५
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे २६ तिथी
मिळवू : ७५ + २६ = १०१
आता
७ ने भागू १०१ / ७ = १४ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
एकादशी श्राद्ध
अपराण्ह काळी एकादशी
तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी जेष्ठ कृष्ण ११ आहे
त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment