Sunday, 6 December 2015

दिनविशेष - ७ डिसेंबर २०१५

तिथी
 कार्तिक कृष्ण ११ (१०:२३) 
वार
 सोमवार    
नक्षत्र
 चित्रा (१८:२५)
योग
 सौभाग्य (१०:२३)
करण
 कौलव (२३:३३)

उत्पत्ति एकादशी / कृष्णैकादशी

कार्तिक कृष्ण एकदशीला 'उत्पत्ति एकादशी' असेही म्हणतात. प्रात:स्नानादी नित्य कर्मे झाल्यावर

'ममाखिल पापक्षयपूर्वक श्रीपरमेश्‍वरप्रीतिकामनया कार्तिक कृष्णैकादशीव्रतं करिष्ये ।'

असा संकल्प करून उपोषण करावे. पूर्वी वर्णन केल्याप्रमाणेच तिथीचा निर्णय घ्यावा व व्रताचे नियम पाळावे.

कामधेनुव्रत

व्रतावधी कार्तिक कृष्ण एकादशीपासून पाच दिवस. याच्या देवता श्री व विष्णू या आहेत. घर, गोठा, चैत्य, देवालय, रस्त्ता, स्मशानभूमी व तलाव या ठिकाणी दिवे लावणे, रात्री फाशांनी खेळणे, एकादशीस उपवास करून विष्णुमूर्तीला गाईच्या दुधाने किंवा तुपाने स्नान घालणे, असा याचा विधी आहे.
फल - सर्व पापांची निष्कृती.

दग्ध योग

१०:२३ पर्यंत सोमवारी एकादशी असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी




संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

Saturday, 5 December 2015

दिनविशेष - ६ डिसेंबर २०१५

तिथी
 कार्तिक कृष्ण १० (७:४९) 
वार
 रविवार  
नक्षत्र
 हस्त (१५:३१)
योग
 आयुष्मान (९:३१)
करण
 बव (२१:०८)

अमृतयोग

१५:३१ नंतर रविवारी हस्त नक्षत्र असल्यामुळे होणारा अमृतसिद्धी योग होत आहे. हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो. 
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज


घबाड

७:४९ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: जेष्ठा
चंद्र नक्षत्र : हस्त
तिथी: १५ + १० = २५
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २३
२३ x ३ = ६९
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे २५ तिथी मिळवू : ६९ + २५ = ९४
आता ७ ने भागू  ९४ / ७ = १३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.


भद्रा


७:४९ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.  विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Friday, 4 December 2015

दिनविशेष - ५ डिसेंबर २०१५

तिथी
 कार्तिक कृष्ण १० (अहोरात्र) 
वार
 शनिवार 
नक्षत्र
 उत्तराफाल्गुनी (१२:२२)
योग
 प्रीति (८:३१)
करण
 वणिज (१८:२६)

मृत्यू योग

१२:२२ नंतर शनिवारी हस्त नक्षत्र असल्यामुळे मृत्यू योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त



यमघंट योग

१२:२२ नंतर शनिवारी हस्त नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे.  हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त



घबाड

१२:२२ नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: जेष्ठा
चंद्र नक्षत्र : हस्त
तिथी: १५ + १० = २५
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २३
२३ x ३ = ६९
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे २५ तिथी मिळवू : ६९ + २५ = ९४
आता ७ ने भागू  ९४ / ७ = १३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

भद्रा

१८:२६ नंतर भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.  विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

दिनविशेष - ४ डिसेंबर २०१५

तिथी
 कार्तिक कृष्ण ९ (२९:०४) 
वार
 शुक्रवार  
नक्षत्र
 पूर्वाफाल्गुनी (०९:१४)
योग
 विष्कंभ (७:३३)
करण
 तैतिल (१५:४२)
सर्वसामान्य दिवस 

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Wednesday, 2 December 2015

दिनविशेष - ३ डिसेंबर २०१५

तिथी
 कार्तिक कृष्ण ८ (२६:२३) 
वार
 गुरुवार
नक्षत्र
 पूर्वाफाल्गुनी (अहोरात्र)
योग
 विष्कंभ (अहोरात्र)
करण
 बालव (१३:१०)

कालाष्टमी

प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी शिव पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.
एक शैव व्रत. आश्‍विन कृष्ण अष्टमीस हे व्रत विहित आहे. कार्तिक व भाद्रपद कृष्ण अष्टमी व या तिथीही या व्रतला उक्त सांगितल्या आहेत. व्रतविधीस दिवसभर उपवास व रात्री चंद्रोदय झाल्यावर भिंतीवर शेंदुराने शिव आणि चंद्र काढून त्यांची पूजा करतात. या पूजेत आठ दिवे लावतात. आठ पात्रांत वडे, पुर्‍या पायस इ. खाद्य वस्तू ठेवून त्यांचा नैवेद्य दाखवितात. ही पूजा कालभैरवा (शिवा) ची असते. पूजेचा ध्यानमंत्र –

अष्टकालं महाकालं भैरवाष्टगणान्वितम्।
चंद्रमासहितं शुक्‍ल मृत्युंजय नमोऽस्तु ते

या दिवशी

'जागरं चोपवासं च कृत्वा कलष्टमीदिने ।
प्रयत: पापनिर्मुक्‍त: शैवो भवति शोभन: ॥'

या वचनानुसार उपोषण करून रात्री जागर करावा, म्हणजे सर्व पापे नाहीशी होतात आणि व्रत करणारा शैव बनतो.

कालभैरव जयंती

कार्तिक कृष्ण अष्टमीला हे व्रत करावे. प्रत्येक प्रहराला भैरवाची यथाविधी पूजा करावी आणि

'भैरवार्घ्यं गृहाणेश भीमरूपाव्ययानघ ।
गृहाण्यार्घ्यं भैरवेदं सपुष्पं परमेश्‍वर ॥'
'पुष्पांजलिं गृहाणेश वरदो भव भैरव ।
पुनरर्घ्यं गृहाणेदं सपुष्पं यातनापह ॥'

असे तीन मंत्र म्हणून तीन अर्घ्यं द्यावेत. रात्री जागर करावा आणि शिवकथा श्रवण करावी. सर्व पापांचे क्षालन होते. भैरवाचा जन्म मध्यान्ही झाला होता म्हणून व्रतासाठी मध्यान्हव्यापिनी अष्टमी घ्यावी.

दांपत्याष्टमी

या व्रतास कार्तिक कृष्ण अष्टमीला प्रारंभ करतात. या व्रतात प्रत्येक महिन्यातील वद्य अष्टमीच्या दिवशी उमा-महेश्‍वराच्या दर्भाच्या मूर्ती करून त्यांची पूजा करतात. त्यांना प्रत्येक महिन्यात निरनिराळ्या नावांनी निरनिराळी फूले वाहतात. निरनिराळ्या खाद्य पदार्थांचे नैवेद्य दाखवितात. वर्षानंतर व्रताचे उद्यापन करतात. त्यावेळी दांपत्य-भोजन घालतात आणि त्याला तांबड्या रंगाची वस्त्रे व दोन सुवर्णधेनू दक्षिणा म्हणुन देतात.
फल- पुत्र, विद्या व शिवलोक यांची प्राप्ती

अनघा व्रत

कार्तिक कृष्ण अष्टमीला दर्भाचे अनघ व अनघा बनवून शेणाने सारवलेल्या पेढीवर त्यांची स्थापना करावी आणि गंधपुष्पादींनी पूजा करावी. अशा प्रकारे एक वर्षापर्यंत प्रत्येक व. अष्टमीस केले असता, सर्व पापे नाहीशी होतात.

अहोई आठे

कार्तिक कृष्ण अष्टमीला उत्तर प्रदेशात हे नाव आहे. हे पुत्रवती स्त्रीचे एक व्रत. त्या दिवशी उपवास करून सायंकाळी भिंतीवर आठ कोठे असलेला एक देवीचा कणा रेखतात. त्याच्याखाली एक माळ व तिचे पिलू काढतात. भिंतीच्या मुळात कलश स्थापन करतात. मग त्या सर्वांची पूजा करून दूध-भाताचा नैवेद्य दाखवितात.

जेष्ठा रवि ११:४६


११:४६ ला रवि जेष्ठा नक्षत्रात प्रवेश करत आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट