Wednesday, 4 January 2017

दिनविशेष - ५ जानेवारी – २०१७




तिथी
 पौष शुक्ल ७ (१४:०१)   
वार
 गुरुवार
नक्षत्र
 उत्तराभाद्रपदा (१६:४५)
योग
 परिघ (२५:३४)
करण
 विष्टि (२५:१७)


उभय सप्तमी

हे व्रत पौष शुक्ल सप्तमी दिवशी उपवास करून सकाळ, दुपार व सायंकाळ तिन्ही वेळा गंध, फुले, घृतादीनी भगवान सूर्याची पूजा करावी. तापलेल्या तुपात मीठ घालून त्यात तळलेल्या मोदकांचा (क्षारमोदकांचा) सूर्यास नैवेद्य दाखवावा. ब्राह्मणांना भोजन द्यावे. गाय दान द्यावी आणि भूमिशयन करावे, म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतात.

मार्तंड सप्तमी

पौष शुक्ल सप्तमीस मार्तंड (सूर्य)- पूजा करावी. गाईचे दान द्यावे, याप्रमाणे वर्षभर केल्यास व्रत करणार्‍यास उत्तम फल प्राप्त होते.


भद्रा

१४:०१ नंतर २५:१७ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.

उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भागान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चर चर वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.

अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.

योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

भद्रा मुख व पृच्छ:
ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. ते अत्यंत अशुभ होय. तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून सर्व कार्यास प्रशस्त मानावे.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Monday, 2 January 2017

दिनविशेष - ४ जानेवारी – २०१७



तिथी
 पौष शुक्ल ६ (१५:०७)   
वार
 बुधवार
नक्षत्र
 पूर्वाभाद्रपदा (१७:१५)
योग
 वरीयान (२७:५३)
करण
 गरज (२६:३७)


बांगरषष्ठी


घबाड

१५:०७ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: पूर्वाषाढा
चंद्र नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा
तिथी: शुक्ल ६
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६ x ३ = १८
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ६ = २४
आता ७ ने भागू  २४ / ७ = ३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

दिनविशेष - ३ जानेवारी – २०१७



तिथी
 पौष शुक्ल ५ (१५:४३)   
वार
 मंगळवार
नक्षत्र
 शततारका (१७:१७)
योग
 सिद्ध (७:२१), व्यतीपात (२९:४८)
करण
 कौलव (२७:२८)


घबाड

१७:१७ नंतर घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: पूर्वाषाढा
चंद्र नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा
तिथी: शुक्ल ६
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६ x ३ = १८
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ६ = २४
आता ७ ने भागू  २४ / ७ = ३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

दग्ध योग

१५:४३ पर्यंत मंगळवारी पंचमी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी



मृत्यू योग

१७:१७ पर्यंत मंगळवारी शततारका नक्षत्र असल्यामुळे मृत्यू योग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त

हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो. असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो. 
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष रहात नाही.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट