Saturday, 1 April 2017

दिनविशेष - १ एप्रिल २०१७




तिथी
 चैत्र शुक्ल ५ (१७:५०)   
वार
 शनिवार
नक्षत्र
 रोहिणी (२६:५४)
योग
 आयुष्यमान (२४:२७)
करण
 बव (७:१४)

कल्पादि

ब्रह्मदेवाच्या  दिवसाच्या आरंभाची जी तिथी असते तिला कल्पादि असे म्हणतात. पुढील सात तिथी कल्पादि आहेत.
१)      चैत्र - शुक्ल ५,
२)      चैत्र – कृष्ण ५
३)      वैशाख – शुक्ल ३
४)      कार्तिक - शुक्ल ७
५)      मार्गशीर्ष – शुक्ल ९
६)      माघ – शुक्ल १३
७)      फाल्गुन – शुक्ल ३
धर्मसिंधु ग्रंथात चैत्र कृष्ण ५ न सांगता चैत्र शुक्ल प्रतिपदा सांगितली आहे.

विष्णूचा दोलोत्सव

श्रीविष्णूंचा दोलोत्सव साजरा करावा. श्रीविष्णूंची पूजा करून झोपाळ्यावर स्थापना करावी. ही मूर्ती ताम्हणात घेऊन पूजा करून झोपाळ्यात ठेवावी.

हयव्रत

चैत्र शुक्ल पंचमीला हे व्रत करतात. या तिथीला हयपंचमी असेही म्हणतात.
फल- संकटनिवारण.

कुमारव्रत

हे व्रत चैत्र शुक्ल पंचमीला करतात. त्या दिवशी मयूरारुढ कार्तिकस्वामीची सुवर्णसमान मूर्ती बनवून त्याचे पूजन करावे. आचार्यांना वस्त्रदान व सुवर्णदान करावे. उपवास करावा आणि चांगल्या वैद्याच्या संमतीने ब्राह्मीचा रस व तूप घ्यावे. अशा प्रकारे प्रत्येक शुद्ध पंचमीला याप्रमाणे एक वर्षपर्यंत हे व्रत केले असता व्रत करणारा महाबुद्धिमान होतो. शास्त्राचे आकलन सहजतेने होते आणि शास्त्रार्थामध्ये 'स्फुरणशक्‍तीचा' चांगला विकास होतो.

पंचरात्र

नवरात्र व्रतांमधीलच हे एक व्रत आहे. याचे वैशिष्ट्य असे की, या व्रतात पंचमीला एकभुक्‍त व्रत करतात. षष्ठीला नक्‍त व्रत, सप्तमीला अयाचित भोजन घेतात, अष्टमीला उपवास (निराहार) आणि नवमीला व्रताचे पारणे करतात. हे व्रत केल्याने देवी अधिक प्रसन्न होते.

लक्ष्मीव्रत

हे व्रत चैत्र शुक्ल पंचमीला करतात. या व्रतात लक्ष्मीचे पूजन करुन सुवर्णाचे कमलपुष्प दान करावे असे सांगितले आहे. असे केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांचा परिहार होतो.

श्रीव्रत

हे व्रत चैत्र शुक्ल पंचमीच्या दिवशी करतात. यासाठी तृतीयेला अभ्यंगस्नान करुन शुद्धवस्त्र परिधान करावे. शुभ्र माला धारण करावी व व्रतमग्न व्हावे. तूप ,दही यांजबरोबर भात सेवन करावा. चतुर्थीला स्नान करुन पुनश्‍च व्रतस्थ व्हावे आणि पंचमीला प्रातःस्नानादी नित्यविधी उरकून लक्ष्मीचे पूजन करावे. पूजेमध्ये धान्य, हळद, आले, ऊस, गूळ व मीठ या वस्तू वाहाव्या आणि लक्ष्मीसूक्‍त म्हणून कमलपुष्पे वाहावीत. ती न मिळाल्यास बिल्वपत्रे (बिल्वकाष्ठे) आणि तीही न मिळाल्यास केवळ घृताची आहुती द्यावी. पुष्करिणी (कमलपुष्पांचे तळे)- मध्ये स्नान करुन सुवर्णदान करावे.
फल: लक्ष्मी प्राप्ती /  श्रीप्राप्ती.

सौभाग्यव्रत

हे व्रत चैत्र शुक्ल पंचमीला करतात. या व्रतात पृथ्वी, पंचमी आणि चंद्र यांचे गंधादी साहित्याने पूजन करुन एकवेळ भोजन करुन राहतात. हे व्रत केल्याने आयुष्य आणि ऐश्‍वर्य वाढते.

अमृतयोग

२६:५४ पर्यंत  शनिवारी रोहिणी नक्षत्र असल्यामुळे होणारा प्रयाणास वर्ज असलेलेला अमृतसिद्धी योग होत आहे.
हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो. 
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज

घबाड

२६:५४ नंतर घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: रेवती
चंद्र नक्षत्र : मृग
तिथी: ६
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६ x ३ = १८
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ६ = २४
आता ७ ने भागू  २४ / ७ = ३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

पंचमी श्राद्ध

अपराण्ह काळी पंचमी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी चैत्र शुक्ल ५ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Thursday, 30 March 2017

दिनविशेष - ३१ मार्च २०१७



तिथी
 चैत्र शुक्ल ४ (२०:४१)   
वार
 शुक्रवार
नक्षत्र
 भरणी (७:०६), कृत्तिका (२८:५३)
योग
 विष्कंभ (७:२७), प्रीति (२७:५१)
करण
 वणिज (१०:११)

विनायक चतुर्थी

विनायकी हे संकष्टीप्रमाणेच एक सर्व कामनांना सिद्धिदायक असे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थीस 'विनायकी चतुर्थी' असे म्हणतात. आपल्या पंचागात विनायकी व संकष्टी असे उल्लेख असतात. संकष्टीप्रमाणेच विनायकी हे व्रत आहे व ते गजाननाला प्रिय आहे. त्याचा पूजाविधी संकष्टीप्रमाणेच असतो. विनायक हे गणपतीचेच नाव आहे. या दिवशी चंद्रदर्शन अथवा चंद्रपूजा याचा संबंध नसतो. या दिवशी दोन वेळा उपवास करावयाचा असतो. दुसरे दिवशी पारणे करतात. या व्रतसाधनाने सर्व विघ्ने, बाधा वगैरेचे निरसन होते व सर्व कामना परिपूर्ण होतात. गणपतीची कृपा होते. महान सिद्धिदायक असे हे व्रत आहे. संकटकाळी पुष्कळ लोक आपल्या संकटनाशनार्थ हे व्रत करतात व श्रीगजाननाला नवस बोलतात. या विनायकी ७, ११, २१, अशा ठरवून करावयाच्या असतात. यातही मंगळवारी येणारी विनायकी 'अंगारिका विनायकी; म्हणून हिचे महत्वही विशेष सांगितले आहे. एक 'अंगारिका विनायकी' चतुर्थी व्रत केल्यास सर्व वर्षातील विनायकी केल्याचे पुण्य मिळते, एवढे या योगाचे महत्व आहे.
या दिवशी सर्व पूजा नेहमीप्रमाणेच अथवा संकष्टीप्रमाणेच अथवा संकष्टीप्रमाणेच मंत्र म्हणून करावी. उपचार समर्पण करताना फक्त
'श्रीसिद्धिविनायकाय नमः |
 असा निर्देश करावा.

आश्रमव्रत

या व्रताचा प्रारंभ चैत्र शुक्लचतुर्थीपासून होतो. तीन महिन्यांचा एक असे वर्षाचे चार भाग करुन प्रत्येक भागात अनुक्रमे वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध यांची पूजा करावयाची, असा या व्रताचा विधी आहे. व्रतावधी एक वर्ष.

गणपतीला दवणा व लाडूचा नैवेद्य समर्पण करणे

या दिवशी श्रीगजाननाला दवणा वाहाव्यात व लाडूचा नैवेद्य अर्पण करावा.

रवि रेवती नक्षत्र प्रवेश

१२:४० ला रवि रेवती नक्षत्रात प्रवेश करीत आहे.

यमघंट योग

२८:५३ नंतर शुक्रवारी रोहिणी नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त


यमघंट योगावर जन्म झाल्यास बालकाला कष्ट होतात. (शांती केल्यास हे कष्ट नष्ट होतात.)
यमघंट योगावर प्रयाण केले असता मृत्यू
ग्रहप्रवेश केला असता कुलक्षय
देवास्थापाना केली असता मृत्यू हि फळे मिळतात.

याशिवाय
चैत्र शुक्ल पक्ष, शुक्ल ५, गुरुवार व कृत्तिका नक्षत्र असल्यास (भरणी नक्षत्राची ९ घटिका २० पळे संपल्यावर पुढे) देखील यमघंट योग होतो.

भद्रा

१०:११ नंतर २०:४१ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.

उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.

अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.

भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.

ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
भद्रा मुख (निंद्य काळ)
शुक्ल चतुर्थी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल अष्टमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल एकादशी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
पोर्णिमा
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण तृतीया
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण सप्तमी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण दशमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण चतुर्दशी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका


तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ मनाला जातो.
भद्रेची तिथी
भद्रा पुच्छ
शुक्ल चतुर्थी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल अष्टमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल एकादशी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
पोर्णिमा
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण तृतीया
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण सप्तमी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण दशमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण चतुर्दशी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका


योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

चतुर्थी श्राद्ध

अपराण्ह काळी चतुर्थी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी चैत्र शुक्ल ४ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट