Wednesday, 27 April 2016

दिनविशेष - २८ एप्रिल २०१६


तिथी
 चैत्र कृष्ण ६ (२१:०५)  
वार
 गुरुवार     
नक्षत्र
 पूर्वाषाढा (२१:०३)
योग
 सिद्ध (१८:४१)
करण
 गरज (८:४८)

दग्ध योग

२१:०५ पर्यंत गुरुवारी षष्ठी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


भद्रा


२१:०५ नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Monday, 25 April 2016

दिनविशेष - २७ एप्रिल २०१६


तिथी
 चैत्र कृष्ण ५ (२०:२३)  
वार
 बुधवार     
नक्षत्र
 मूळ (१९:४३)
योग
 शिव (१९:०८)
करण
 कौलव (०७:५१)

श्री चंद्रला देवीचा उत्सव

या दिवशी श्री चंद्रला देवीचा उत्सव असतो.

रविचा भरणी नक्षत्र प्रवेश

११:४२ ला रवि भरणी नक्षत्रात प्रवेश करीत आहे.

यमघंट योग

१९: ४३ पर्यंत बुधवारी मूळ नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त




संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

दिनविशेष - २६ एप्रिल २०१६


तिथी
 चैत्र कृष्ण ४ (१९:११)  
वार
 मंगळवार     
नक्षत्र
 जेष्ठा (१७:५४)
योग
 परिघ (१९:१२)
करण
 बव (०६:२५)

घबाड

१७:५४ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: अश्विनी
चंद्र नक्षत्र : जेष्ठा
तिथी: १५ + ४ = १९ 
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८ x ३ = ५४
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १९ तिथी मिळवू : ५४ + १९ = ७३
आता ७ ने भागू  ७३ / ७ = १० ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

दग्धयोग

१९:११ नंतर मंगळवारी पंचमी तिथी असल्यामुळे दग्धयोग होत आहे.
तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी




संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Sunday, 24 April 2016

दिनविशेष - २५ एप्रिल २०१६


तिथी
 चैत्र कृष्ण ३ (१७:३३)  
वार
 सोमवार     
नक्षत्र
 अनुराधा (१५:४०)
योग
 वरीयान (१८:५६)
करण
 बव (--:--)

संकष्ट चतुर्थी

पुणे चंद्रोदय: २१:३२
श्रीगणपतीच्या व्रतांपैकी हे दर महिन्यास येणारे एक संकटनाशक, महासिद्धिदायक असे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या वद्य पक्षात जी चतुर्थी असते, त्या चतुर्थीस 'संकष्टी -चतुर्थी ' असे म्हण्तात. या दिवशी दिवसभर उपवास करावयाचा असतो. रात्रौ चंद्रदर्शनानंतर गणपतीची षोडशोपचारे पूजा करावी व त्यानंतर चंद्राची पूजा करुन त्याला व चतुर्थी तिथीला अर्घ्य द्यावे, अशी पद्धत आहे. श्रीगणपती ही विघ्ननाशक देवता असल्याने हा या व्रतप्रभावाने ती प्रसन्न होते आणि सर्व विघ्नांचा नाश होतो, असे महात्म्य आहे. या दिवशी चंद्रदर्शनानंतर चंद्राची पूजा करुन पारणे करावयाचे असते; हे ह्या व्रताचे मुख्य अंग आहे. या दिवशी संध्याकाळी आंघोळ करुन श्रीगणपतीच्या पूजेची तयारी करून घ्यावी. पुजास्थानी घरातील गणेशमूर्ती असेल तर ती ठेवावी. नसल्यास सुपारी अक्षतापुंजावर ठेवून तिची गणपती म्हणून पूजा करावी. अथर्वशीर्षाची २१ आवर्तने करावीत. पूजा षोडशोपचारांनी पंचामृतअभिषेकासह करावी. आवर्तनाच्या प्रत्येक वेळी
'श्रीविघ्नविनायकदेवताभ्यो नमः '
असे म्हणावे. प्रारंभी संकल्प करताना 'अमुक संकटनाशनार्थ' असे म्हणून त्या संकटाचा उल्लेख करावा.चंद्राला अर्घ्य द्यावा. त्याच्या दिशेने गंध, फूल,अक्षता उडवाव्या व नमस्कार करावा. चतुर्थी तिथीला अर्घ्य ताम्हनात द्यावा व शेवटी महानैवेद्य दखवून पारणे करावे. कथा ऐकावी. यायोगे सर्व संकटाचा नाश होतो, व गणेशकृपा होते, असा अनुभव आहे.
मंगळवारी येणार्‍या चतुर्थीला 'अंगारकी संकष्टी ' म्हणतात. हा एक महान योग आहे. हे संकष्टीचे व्रत यथासांग करणार्‍यास वर्षातील सर्व चतुर्थी केल्याचे पुण्य मिळते. यथाविधी व षोडशोपचारांनी गणपतीचे पूजन केल्यानंतर चंद्रोदय होताच चतुर्थी तिथीस, चंद्रास आणि श्रीगजाननास अर्घ्यप्रदान करावे. गजाननाची करुणा भाकावी. या व्रताच्या प्रभावाने साधकाची सर्व विघ्ने, संकटे दूर होतात. त्यास सर्व ऐहिक सुखे प्राप्त होऊन मंगलमूर्तीचे दर्शन होते, साक्षात्कार होतो, अशी लोकांत श्रद्धा आहे.

संकष्टी चतुर्थीची कथा

पूर्वी द्वारकेत सत्रजित नावाचा एक मोठा राजा होवून गेला. सत्रजित सूर्याचा मोठा भक्त होता त्याच्या उपासनेने. प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य स्यमंतक मणी दिला. त्या मण्यात सूर्याचे तेज होते,. या मण्यामुळे राजास दररोज आठ भार सोने प्राप्त होई. त्यामुळे सत्राजित अभिमानी झाला.
सत्रजितची कन्या सत्यभामा हि अत्यंत रूपवती व सर्व कलासंपन्न होती ती कृष्णावर मनोमन प्रेम करायची त्यामुळे सत्राजित श्रीकृष्णाचा द्वेष करीत असे. सत्राजिताने सात्यकी बरोबर सत्यभामेचा विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला असता सात्यकीने विवाहास नकार दिला त्याला ठावूक होते कि सत्यभामेचे कृष्णावर प्रेम आहे,त्यामुळे सत्रजित श्रीकृष्णाचा अधिकच द्वेष करू लागला.
पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधु प्रसंनजित हा स्यमंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याला ठार मारले व खावून टाकले पण तो दिव्यमणी सिहाच्या गळ्यात अडकला पुढे त्या सिंहास जांबुवंताने ठार केले व तो स्यमंतक मणी हस्तगत केला.
इकडे बंधू प्रसंनजित व स्यमंतक मणी दोन्ही गायब झाल्याने सत्रजितला कृष्णाचा संशय आला त्याने कृष्णावर मणी चोरल्याचा आरोप केला. चोरीच्या आरोपाने श्रीकृष्ण दुखी झाला व आपल्यावरील चोरीचा आळ दूर करण्यासाठी कृष्ण अरण्याकडे निघाला. जंगलात एका गुहेतून दिव्य प्रकाश येत होता सैन्याला बाहेर थांबवून कृष्ण एकटाच गुहेत शिरला ती गुहा जांबुवंताची होती जम्बुवाताने कृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले होते. जांबुवंत हा ब्रम्हाचा पुत्र होता, लंकाविजयात त्याने रामाला साथ दिली होती त्याला आशीर्वाद होता कि श्रीकृष्णा शिवाय त्याला युद्धात कोणी हरवू शकत नव्हते,
जम्बुवान्ताला समजले कि तो प्रत्यक्ष प्रभूंशी युध्द करत आहे तेव्हा तो कृष्णाला शरण गेला इकडे गोकुळात नंद-यशोदेला या युद्धाची वार्ता कळली. तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहर्त्या श्रीगणेशाची प्रार्थना केली व संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले.
श्रीगणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्णास विजयप्राप्ती झाली. जांबुवंताने स्यमंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली. त्यांना घेवून श्रीकृष्ण द्वारकेत परतला त्याने सत्राजिताला मणी परत केला, तेव्हा सत्रजित लज्जित झाला सत्रजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागितली व त्याने आपली कन्या सत्यभामेशी श्रीकृष्णाचा विवाह लावून दिला् व अशा प्रकारे संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला.
दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. या व्रतामुळे संकटहर्त्या श्रीगणेशाची कृपा लाभते. भक्तांची संकटे दूर होतात. त्यांच्या मनोकामना पूर्ण  होतात.दिवसभर उपोषण करुन, रात्रौ चंद्रोदयाच्या वेळी श्रीगणपतीची पूजा करुन, चंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडावयाचे. असे हे व्रत असते.

दुसरी तीज


घबाड

१७:३३ नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: अश्विनी
चंद्र नक्षत्र : जेष्ठा
तिथी: १५ + ४ = १९ 
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८ x ३ = ५४
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १९ तिथी मिळवू : ५४ + १९ = ७३
आता ७ ने भागू  ७३ / ७ = १० ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

भद्रा


१७:३३ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Sunday, 10 April 2016

दिनविशेष - ११ एप्रिल २०१६


तिथी
 चैत्र शुक्ल ५ (२४:२७)  
वार
 सोमवार     
नक्षत्र
 रोहिणी (१६:११)
योग
 सौभाग्य (१९:३०)
करण
 बव (१३:३६)

कल्पादि

ब्रह्मदेवाच्या  दिवसाच्या आरंभाची जी तिथी असते तिला कल्पादि असे म्हणतात. पुढील सात तिथी कल्पादि आहेत.
१)      चैत्र - शुक्ल ५,
२)      चैत्र – कृष्ण ५
३)      वैशाख – शुक्ल ३
४)      कार्तिक - शुक्ल ७
५)      मार्गशीर्ष – शुक्ल ९
६)      माघ – शुक्ल १३
७)      फाल्गुन – शुक्ल ३
धर्मसिंधु ग्रंथात चैत्र कृष्ण ५ न सांगता चैत्र शुक्ल प्रतिपदा सांगितली आहे.

विष्णूचा दोलोत्सव

श्रीविष्णूंचा दोलोत्सव साजरा करावा. श्रीविष्णूंची पूजा करून झोपाळ्यावर स्थापना करावी. ही मूर्ती ताम्हणात घेऊन पूजा करून झोपाळ्यात ठेवावी.

हयव्रत

चैत्र शुक्ल पंचमीला हे व्रत करतात. या तिथीला हयपंचमी असेही म्हणतात.
फल- संकटनिवारण.

कुमारव्रत

हे व्रत चैत्र शुक्ल पंचमीला करतात. त्या दिवशी मयूरारुढ कार्तिकस्वामीची सुवर्णसमान मूर्ती बनवून त्याचे पूजन करावे. आचार्यांना वस्त्रदान व सुवर्णदान करावे. उपवास करावा आणि चांगल्या वैद्याच्या संमतीने ब्राह्मीचा रस व तूप घ्यावे. अशा प्रकारे प्रत्येक शुद्ध पंचमीला याप्रमाणे एक वर्षपर्यंत हे व्रत केले असता व्रत करणारा महाबुद्धिमान होतो. शास्त्राचे आकलन सहजतेने होते आणि शास्त्रार्थामध्ये 'स्फुरणशक्‍तीचा' चांगला विकास होतो.

पंचरात्र

नवरात्र व्रतांमधीलच हे एक व्रत आहे. याचे वैशिष्ट्य असे की, या व्रतात पंचमीला एकभुक्‍त व्रत करतात. षष्ठीला नक्‍त व्रत, सप्तमीला अयाचित भोजन घेतात, अष्टमीला उपवास (निराहार) आणि नवमीला व्रताचे पारणे करतात. हे व्रत केल्याने देवी अधिक प्रसन्न होते.

लक्ष्मीव्रत

हे व्रत चैत्र शुक्ल पंचमीला करतात. या व्रतात लक्ष्मीचे पूजन करुन सुवर्णाचे कमलपुष्प दान करावे असे सांगितले आहे. असे केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांचा परिहार होतो.

श्रीव्रत

हे व्रत चैत्र शुक्ल पंचमीच्या दिवशी करतात. यासाठी तृतीयेला अभ्यंगस्नान करुन शुद्धवस्त्र परिधान करावे. शुभ्र माला धारण करावी व व्रतमग्न व्हावे. तूप ,दही यांजबरोबर भात सेवन करावा. चतुर्थीला स्नान करुन पुनश्‍च व्रतस्थ व्हावे आणि पंचमीला प्रातःस्नानादी नित्यविधी उरकून लक्ष्मीचे पूजन करावे. पूजेमध्ये धान्य, हळद, आले, ऊस, गूळ व मीठ या वस्तू वाहाव्या आणि लक्ष्मीसूक्‍त म्हणून कमलपुष्पे वाहावीत. ती न मिळाल्यास बिल्वपत्रे (बिल्वकाष्ठे) आणि तीही न मिळाल्यास केवळ घृताची आहुती द्यावी. पुष्करिणी (कमलपुष्पांचे तळे)- मध्ये स्नान करुन सुवर्णदान करावे.
फल: लक्ष्मी प्राप्ती /  श्रीप्राप्ती.

सौभाग्यव्रत

हे व्रत चैत्र शुक्ल पंचमीला करतात. या व्रतात पृथ्वी, पंचमी आणि चंद्र यांचे गंधादी साहित्याने पूजन करुन एकवेळ भोजन करुन राहतात. हे व्रत केल्याने आयुष्य आणि ऐश्‍वर्य वाढते.

अमृतयोग

१६:११ नंतर सोमवारी मृग नक्षत्र असल्यामुळे होणारा अमृतसिद्धी योग होत आहे.
हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो. 
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज

घबाड

२४:२७ नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: रेवती
चंद्र नक्षत्र : मृग
तिथी: ६
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६ x ३ = १८
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ६ = २४
आता ७ ने भागू  २४ / ७ = ३ ३/७

बाकी ३ म्हणून घबाड.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट