Thursday, 29 December 2016

दिनविशेष - २९ डिसेंबर – २०१६




तिथी
 मार्गशीर्ष अमावास्या (१२:२३)   
वार
 गुरुवार
नक्षत्र
 मूळ (११:१७)
योग
 वृद्धि (१०:२१)
करण
 किंस्तुघ्न (२५:०९)

अन्वाधान

अग्नी हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ष्टिच्या च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

दिनविशेष - ३० डिसेंबर – २०१६




तिथी
 पौष शुक्ल १ (१३:४९)   
वार
 शुक्रवार
नक्षत्र
 पूर्वाषाढा (१३:१३)
योग
 ध्रुव (१०:१९)
करण
 बालव (२६:२३)

चंद्रदर्शन

अमावास्येला दिसेनासा झालेला चंद्र रविच्या पुढे १२ अंश गेला कि चंद्रदर्शन होते. १९:१९ ला पश्चिमेकडे चंद्रदर्शन होईल. सामुदायिक मुहूर्त ४५ म्हणजे समर्घ आहेत.

इष्टि

इष्टि  म्हणजे यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

दर्श-वेळा अमावास्या



दर्श-वेळा अमावास्या

मुळ कर्नाटकातील असणारा महाराष्ट्रातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यासोबत शेजारील तालुक्यांमध्ये मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ही आमावस्या दर्श-वेळा अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. मूळ कानडी शब्द "येळ्ळ अमावस्या" म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळी अमावस्या, याचाच अपभ्रंश होऊन वेळ अमावस्या शब्द रुढ झाला.
      या दिवशी सकाळी लवकरच शेतकरी आपल्या घरपरिवारासह शेताकडे जातात. अगोदरच्या दिवशी कडब्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये शेतीत असणाऱ्या सर्व पिकांची व मातीपासून बनवलेल्या पांडवांची [पंचमहाभूते] पुजा करतात. तर एक व्यक्ती एका रंगविलेल्या माठामध्ये अंबिल भरून त्याचा गावातील ग्रामदेवतेस नैवेद्य दाखवून शेतात कोपीवर आणले जाते. ज्वारी व बाजरीचे उंडे, आंबट भात, सर्व भाज्यांपासून तयार केलेली "भज्जी", खीर, आंबिल असे एक ना अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो. बनविलेल्या सर्व पदार्थांचा प्रसाद म्हणून वनभोजनाच्या रुपात आस्वाद घेतात.`सणानिमीत्त एकमेकांना जेवण्यासाठी आमंत्रणे दिली जातात. ज्यांना शेती नाही अशांना आवर्जुन जेवायला शेतात बोलावले जाते. शहरी भागातील लोकांसाठी तर हा सण म्हणजे पर्वणी असतो. या दिवशी उस्मानाबाद व लातूर शहरात तर अघोषित संचारबंदीच असते. शहरे ओस व खेडी माणसांनी व आनंदाने हर्षोल्हासीत झालेली असतात.
       काही भागात या दिवशी पतंग उडविले जातात. तर काही भागातील लोक सायंकाळी गावात एकत्र जमून ताकदीचे खेळ खेळतात.

Tuesday, 27 December 2016

दिनविशेष - २८ डिसेंबर – २०१६



तिथी
 मार्गशीर्ष कृष्ण १४ (१०:३७)   
वार
 बुधवार
नक्षत्र
 जेष्ठा (९:०१)
योग
 गंड (१०:०७)
करण
 चतुष्पाद (२३:३३)

दर्श-वेळा अमावास्या

अमावस्या ही पर्वतिथी आहे. यावेळी जप,तप, दान, अथवा व्रत केले असता अधिक फलप्राप्ती होते. या तिथीस श्राद्ध केले असता पितर तृप्त होतात.
दर्शश्राद्ध : दर्शाच्या दिवशी केले जाणारे श्राद्ध पितृत्रयी, मातृत्रयी व मातामहत्रयी यांना उद्देशून करतात. हे श्राद्ध नेहमीच्या श्राद्धासारखेच असते.

गौरीतप

हे स्त्रियांचे एक व्रत. हे मार्गशीर्ष अमावस्येस करतात. या व्रतात मध्यरात्री मंदिरात जाऊन शिव-पार्वतीची पूजा करावयाची असते. व्रतावधी सोळा वर्षे. नंतर मार्गशीर्ष पौर्णिमेला उद्यापन करतात. याला 'महाव्रत ' असेही म्हणतात.
फल-पुत्रप्राप्ती.

महोदघी अमावस्या

मार्गशीर्ष महिन्यातील चतुर्दशीने युक्त असलेल्या अमावस्येला हे नाव आहे. या दिवशी व्रतधारी व्यक्तीने समुद्रस्नान करावयाचे असते.
फल-अश्‍वमेधाचे पुण्य मिळते

रवि पूर्वाषाढा नक्षत्र प्रवेश

२३:०७ ला रवि पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश करीत आहे.

यमघंट योग

९:०१ नंतर बुधवारी मूळ नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त


यमघंट योगावर जन्म झाल्यास बालकाला कष्ट होतात. (शांती केल्यास हे कष्ट नष्ट होतात.)
यमघंट योगावर प्रयाण केले असता मृत्यू
ग्रहप्रवेश केला असता कुलक्षय
देवास्थापाना केली असता मृत्यू हि फळे मिळतात.

याशिवाय
चैत्र शुक्ल पक्ष, शुक्ल ५, गुरुवार व कृत्तिका नक्षत्र असल्यास (भरणी नक्षत्राची ९ घटिका २० पळे संपल्यावर पुढे) देखील यमघंट योग होतो.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट