तिथी
|
फाल्गुन कृष्ण १ (२०:५२)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
उत्तराफाल्गुनी (१८:४२)
|
योग
|
गंड (२६:१५)
|
करण
|
बालव (८:३४)
|
धुलिवंदन
होळीचे दुसरे दिवशी
सकाळी होलिकेचे भस्म कपाळाला लावावे. त्यावेळेस खालील श्लोक म्हणावा.
वंदितासि सुरेंद्रेण ब्राह्मणा शंकरेणच |
अतस्त्वां पाहिनो देवि भूते भूतिप्रदाभव ||
अर्थात, हे होलिकादेवी,
तुला ब्रह्मा, विष्णु आणि शंकरांनी वंदन केले आहे. म्हणून तू आमचे रक्षण कर.
आणि सर्व भूत (प्राणि) मात्रांचे कल्याण कर व ऐश्वर्य दे.
अभ्यंगस्नान व आम्रकुसुमप्राशन
होलिकेचे भस्म कपाळाला लावल्यानंतर अभ्यंग स्नान करावे. चंदनाच्या गंधात
आंब्याचा मोहर घालून केलेले मिश्रण प्यावे.
करिदिन
होळीचा दुसरा दिवस म्हणून
हा करिदिन आहे.
ग्रहण दिवस, होळी, आयन दिन
(उत्तरायण आणि दक्षिणायनाचा दिवस), भावुका अमावास्या व प्रेतदाहविधीचा दिवस अशा ५
प्रकारच्या दिवसांच्या दुसऱ्या दिवसाला करिदिन म्हणतात. हे ५ दिवस व त्यापुढचा
म्हणजे करिदिन सर्व शुभ कार्याला वर्ज समजले जातात.
वसंतोत्सवारंभ
या दिवशी नृत्य,
नाटक, गायन, वादन आदि कार्यक्रमांनी वसंतोत्सव साजरा करावा.
इष्टि
इष्टि म्हणजे
यज्ञ.
यज्ञ
संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि
म्हणतात.
प्रतिपदा श्राद्ध
अपराण्ह काळी प्रतिपदा तिथी
असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी फाल्गुन कृष्ण १ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध
करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि
अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त
मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन
वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त
प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर
३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment