Friday, 24 March 2017

दिनविशेष - २५ मार्च २०१७



तिथी
 फाल्गुन कृष्ण १२ (१३:३४)   
वार
 शनिवार
नक्षत्र
 धनिष्ठा (१६:५८)
योग
 साध्य (२६:३१)
करण
 गरज (२५:०७)


शनिप्रदोष

सूर्यास्तानंतर पुढे ३ मुहूर्त (म्हणजे मध्यम मानाने  साधारण २ तास २४ मिनिटे ) प्रदोष काळ असतो.
प्रत्येक चांद्र मासात प्रदोष काळी जेव्हा त्रयोदशी असेल त्या दिवशी प्रदोष निमित्त उपास करतात.
कामनाभेद ' हा या व्रताचा विशेष आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला हे व्रत करावे. याप्रमाणे एक वर्षभर करावे. व्रतादिवशी प्रात: स्नान करुन
'मम पुत्रादिप्राप्तिकामनया प्रदोषव्रतमहं करिष्ये'

 इ. संकल्प करून व्रतारंभ करावा. सायंकाळी पुन्हा स्नान करावे. श्रीशंकराचे पुढे बसून वेदपाठी ब्राह्मणाज्ञेप्रमाणे पुढील मंत्राने प्रार्थना करावी व षोड्शोपचारे पूजा करावी.

भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥
उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे । ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥

भाजलेले सातूचे पीठ , तूप व साखरेचा नैवेद्य अर्पण करावा. याप्रमाणे करून तेथेच आठ दिशांना आठ दिवे प्रज्वलित करावेत व प्रत्येक दिवा लावताना आठ वेळा नमस्कार करावा.
'धर्मस्त्वं वृष रूपेण जगदानन्दकारक।
अष्टमूर्तैरधिष्ठानं अथः पाहि सनातन ।'
 या मंत्राने नंदिकेश्वराला पाणी दुर्वा आदि देऊन त्याची पूजा करावी व त्याला स्पर्श करुन पुढील मंत्राने शंकर, पार्वती आणि नंदिकेश्वराची प्रार्थना करावी.  

ऋणरोगादि दारिद्र्यम ये चान्ये चापम्रुत्यव: !
भय क्लेश मनस्ताप: नश्यनंतु मम सर्वदा !! "
( कर्ज,रोग,गरिबी,अपम्रूतू,भय, त्रास ईत्यादि मनस्ताप माझे  कायमचे नाहिशे होवोत.)

हे व्रत विशेषत: स्त्रियांनी करण्याचे आहे. नंदीच्या शेपूट व शिंगे आदींच्या स्पर्शाने अभीष्टसिद्धी होते.
Ø  सोमवार: शांतीरक्षणासाठी सोम प्रदोष करावा.
Ø  मंगळवार: ऋणमुक्त होण्यासाठी भौम प्रदोष करावा.
Ø  शुक्रवार: सौभाग्य किंवा स्त्री-समृद्धीची इच्छा असेल तर शुक्रवारी हे व्रत करावे.
Ø  शनिवार: पुत्र प्राप्तीसाठी शनिप्रदोष वर्षभर किंवा फलप्राप्ती होई पर्यंत करावा. 
Ø  रविवार: आयुर्दायासाठी अर्कप्रदोष हे व्रत करावे.

शुक्र पूर्व दर्शन

आजपासून शुक्र ताऱ्याचे दर्शन पूर्वेकडे सूर्योदयापूर्वी होऊ लागेल.
ग्रहांचे सूर्य सानिध्यामुळे अदर्शन होते. यालाच ‘अस्त’ असे म्हणतात. आणि तोच ग्रह सूर्यापासून ठराविक अंतारावर गेला कि त्याचे दर्शन आपल्याला पूर्वेस अथवा पश्चिमेस होऊ लागते. त्याला ‘उदय’ असे म्हणतात.
सूर्यापासून प्रत्येक ग्रह जितक्या अंशावर असता आपल्याला त्याचे दर्शन होऊ शकते म्हणजेच ग्रहाचा उदय होतो, त्याला त्या ग्रहाचे ‘कालांश’ असे संबोधतात.
शुक्राचा कालांश ८ अंश असतो.
शुक्र हा अतिशय तेजस्वी आहे. पहाटे सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावर किंवा सायंकाळी सुर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर सुमारे तीन तासापर्यंत दिसू शकतो.
शुक्र हा शुभग्रह असल्यामुळे तो अस्तंगत असताना अनेक शुभ कार्यांना वर्ज असतो.
अस्त होण्यापूर्वी काही दिवस त्याच्या तेजाच्या वार्धक्याचे व उदयानंतर काही दिवस तेजाच्या बालात्वाचे म्हणूनही धर्म कार्यात वर्ज सांगितले आहेत.
बालत्व / वृद्धत्व
दिशा
दिवस
बालत्व
पूर्वेस उदय
१५ / १० / ७ / ५ / ३ दिवस
बालत्व
पश्चिमेस उदय
१५ / १० / ७
वृद्धत्व
पूर्वेस अस्त
१५ / १० / ७
वृद्धत्व
पश्चिमेस अस्त
१५ / १०/ ७ / ५

महावारुणी योग

१६:५८ ते सूर्यास्तापर्यंत महावारुणी योग होत आहे.
अमान्त फाल्गुन कृष्ण (पौर्णिमांत चैत्र कृष्ण) त्रयोदशीच्या दिवशी शततारका नक्षत्र असेल तर तो वारुणी योग होतो. या योगावर गंगास्नान केले असता शंभर सूर्यग्रहणातील स्नानांचे फळ मिळते. यावेळी शनिवार असेल तर तो ‘महावारुणी’ योग होतो. त्यात ‘शुभ’ योग असेल, तर तो ‘महामहावारुणी’ योग होऊन त्या योगावर गंगास्नान केले तर तीन कोटी कुलांचा उद्धार होतो अशी मान्यता आहे.

त्रयोदशी श्राद्ध

अपराण्ह काळी त्रयोदशी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी फाल्गुन कृष्ण १३ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment