तिथी
|
फाल्गुन कृष्ण ११ (१३:५४)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
श्रवण (१६:४५)
|
योग
|
सिद्ध (२८:१५)
|
करण
|
कौलव (२५:५०)
|
पापमोचनी एकादशी
फाल्गुन कृष्ण एकादशीला पापमोचनी
एकादशी असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूंचे पूजन केले जाते व उपवास करतात.
छंदोदेवपूजा
हे एक एक
स्त्रीव्रत आहे. फाल्गुन कृष्ण एकादशीला स्त्रिया छंदोदेवाची पूजा करतात. त्याला
जलचर प्राण्यांचे मांस, रुचकर खाद्यपदार्थ, केशर, इ. वस्तू समर्पण करतात.
फल - सौभाग्यप्राप्ती व कामनापूर्ती.
श्रवणोपवास
द्वादशी श्राद्ध
अपराण्ह काळी द्वादशी तिथी
असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी फाल्गुन कृष्ण १२ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध
करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि
अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त
मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन
वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त
प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ,
त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने
दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व
कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment