तिथी
|
फाल्गुन शुक्ल १० (२४:१८)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
आर्द्रा (१८:३६)
|
योग
|
आयुष्यमान (१३:४१)
|
करण
|
तैतिल (१३:०८)
|
यमघंट योग
१८:३६ पर्यंत मंगळवारी
आर्द्रा नक्षत्र असल्यामुळे यमघंटयोग होत आहे.
हा
योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज
सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
|
सोमवार – विशाखा
|
मंगळवार – आर्द्रा
|
बुधवार – मूळ
|
गुरुवार – कृत्तिका
|
शुक्रवार – रोहिणी
|
शनिवार – हस्त
|
|
यमघंट योगावर जन्म
झाल्यास बालकाला कष्ट होतात. (शांती केल्यास हे कष्ट नष्ट होतात.)
यमघंट योगावर प्रयाण
केले असता मृत्यू
ग्रहप्रवेश केला असता
कुलक्षय
देवास्थापाना केली असता
मृत्यू हि फळे मिळतात.
याशिवाय
चैत्र शुक्ल पक्ष, शुक्ल ५,
गुरुवार व कृत्तिका नक्षत्र असल्यास (भरणी नक्षत्राची ९ घटिका २० पळे संपल्यावर
पुढे) देखील यमघंट योग होतो.
दशमी श्राद्ध
अपराण्ह काळी दशमी तिथी
असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी फाल्गुन शुक्ल १० आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध
करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि
अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त
मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन
वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त
प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ,
त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने
दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व
कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment