तिथी
|
चैत्र शुक्ल ६ (१५:१६)
|
वार
|
रविवार
|
नक्षत्र
|
मृग (२५:१४)
|
योग
|
सौभाग्य (२१:१८)
|
करण
|
तैतिल (१५:१६)
|
कार्तिकस्वामीला दवणा वाहणे
या दिवशी कार्तिकस्वामीला
दवणा वाहाव्यात.
कुमारव्रत व कार्तिकेय पुजन
चैत्र शुक्ल
षष्ठीची देवता कार्तिकस्वामी. या दिवशी मयूरवाहन कार्तिकस्वामींची मूर्ती करुन
तिची पूजा करतात. या व्रतात उपोषण व ब्राह्मीचा रस आणि तूप यांचे प्राशन करावयाचे
असते.
फल-बुद्धिमत्ता, शास्त्र व
पांडित्य यांचा लाभ.
अशोकष्ष्ठी
हे एक तिथिव्रत
आहे. चैत्र शुक्ल षष्ठीस हे व्रत करतात. या व्रतास षष्ठीदेवीचे पूजन करतात व
अशोकाच्या सहा कळ्या व सहा मुगाचे दाणे मिसळून दह्याबरोबर खातात.
फल- सुख व अपत्यप्राप्ती.
पद्मकयोग
षष्ठी, सप्तमी आणि रविवार असा योग आला कि पद्मक योग होतो.
जेव्हा सूर्य विशाखा
नक्षत्रात असेल तेव्हा ज्या दिवशी चंद्र कृत्तिका नक्षत्रात असेल त्या
दिवशी पद्मक योग होतो.
पुष्करतीर्थामध्ये या
योगावर स्नान केले असता महाफल मिळते.
घबाड
१५:१६ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी
शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: रेवती
चंद्र
नक्षत्र : मृग
तिथी:
६
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६
x ३ = १८
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे ६ तिथी
मिळवू : १८ + ६ = २४
आता
७ ने भागू २४ / ७ = ३ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
षष्ठी-सप्तमी श्राद्ध
अपराण्ह काळी षष्ठी
व सप्तमी या दोन्ही तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी चैत्र
शुक्ल ६, किंवा चैत्र शुक्ल ७ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment