|
तिथी
|
पौष शुक्ल १० (२४:०४)
|
|
वार
|
बुधवार
|
|
नक्षत्र
|
भरणी (१४:१२)
|
|
योग
|
शुभ (२७:४४)
|
|
करण
|
तैतिल (१२:३२), गरज (२४:०४)
|
करिदिन
मकर संक्रमणानंतरचा दुसरा दिवस
म्हणून हा करिदिन आहे.
ग्रहण
दिवस, होळी, आयन दिन (उत्तरायण आणि दक्षिणायनाचा दिवस), भावुका अमावास्या व
प्रेतदाहविधीचा दिवस अशा ५ प्रकारच्या दिवसांच्या दुसऱ्या दिवसाला करिदिन म्हणतात.
हे ५ दिवस व त्यापुढचा म्हणजे करिदिन सर्व शुभ कार्याला वर्ज समजले जातात.
दशमी श्राद्ध
अपराण्ह काळी दशमी
तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी पौष शुक्ल १० असेल तर या दिवशी
श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ:
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
©संकलन: सौ. प्राची शिंदे.
No comments:
Post a Comment