Monday, 7 January 2019

दिनविशेष - १२ जानेवारी २०१९



तिथी
पौष शुक्ल ६ (२२:०५)
वार
शनिवार
नक्षत्र
पूर्वाभाद्रपदा (८:४३)
योग
परिघ (अहोरात्र)
करण
कौलव (९:०३), तैतिल (२२:०५)


स्वामी विवेकानंद जयंती

स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १६३ ला कोलकत्ता येथे झाला.
स्वामी विवेकानंद  हे भारताचे थोर संत व नेते होते. विवेकानंद ह्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त (नरेंद्र, नरेन) असे होते. ते मूळचे बंगालचे रहिवासी होते. ते श्री रामकृष्ण परमहंस ह्यांचे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत.

राजमाता जिजाऊ / जिजाबाई शहाजी भोसले जन्मदिन

१२ जानेवारी १५९८ ला यांचा जन्म झाला. ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. 

घबाड

८:४३ नंतर २२:०५ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: उत्तराषाढा
चंद्र नक्षत्र : उत्तराभाद्रपदा
तिथी: शुक्ल ६ = ६
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
x ३ = १८
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ६ = २४
आता ७ ने भागू  २४ / ७ = ३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

बांगरषष्ठी



षष्ठी श्राद्ध

अपराण्ह काळी षष्ठी तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी पौष शुक्ल ६ असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ:
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
©संकलन: सौ. प्राची शिंदे.

No comments:

Post a Comment