तिथी
|
पौष शुक्ल २ (११:५४)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
श्रवण (२३:४०)
|
योग
|
वज्र (२८:३५)
|
करण
|
कौलव (११:५४), तैतिल (२५:१६)
|
आरोग्यव्रत किंवा आरोग्य द्वितीया
पौष शुक्ल द्वितीये दिवशी
गो-शृंगोदका (गाईची शिंगे धुऊन घेतलेले पाणी) - ने स्नान करावे. श्वेतवस्त्रे
परिधान करावीत. सूर्यास्तानंतर बालेंदू म्हणजे द्वितीयेच्या चंद्राची पूजा करावी.
जोपर्यंत त्याचा अस्त होत नाही ,तोपर्यंत गूळ, दही, परमान्न (खीर) आणि मीठ यांचे दान द्यावे. ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर केवळ
गाईच्या दुधाचे ताक प्राशन करून भूमिशयन करावे. याप्रमाणे प्रत्येक शुक्ल
द्वितीयेला एक वर्षपर्यंत चंद्रपूजन व भोजनादी व्रत करावे व बाराव्या महिन्यात (मार्गशीर्ष)
ला बालेंदुची यथासांग पूजा करावी आणि घागर भरुन उसाचा रस, सोने व वस्त्र ब्राह्मणाला
दान देऊन मग स्वतः जेवावे. यायोगे रोगनिवृत्ती होऊन आरोग्यवृद्धी होते.
सर्वप्रकारची सुखे प्राप्त होतात.
या दिवशी गुरुवार असेल, तर प्रातःस्नान झाल्यावर यथाविधी ब्रह्मदेवाची पूजा करून नक्तव्रत करावे.
यायोगे उत्तम संपत्ती प्राप्त होते. यालाच विधिपूजा म्हणतात. हे व्रत
ब्रह्मपुरात सांगितले आहे.
मुस्लीम जमादिलावल मासारंभ
मुस्लीम
कालगणनेनुसार जमादिलावल मास आरंभ होत आहे
तृतीया श्राद्ध
अपराण्ह काळी तृतीया
तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी पौष शुक्ल ३ असेल तर या दिवशी
श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ:
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
©संकलन: सौ. प्राची शिंदे.
No comments:
Post a Comment