Friday, 11 March 2016

दिनविशेष - १२ मार्च २०१६

तिथी
 फाल्गुन शुक्ल ४ (१८:०३) 
वार
 शनिवार     
नक्षत्र
 अश्विनी (१३:१५)
योग
 ऐंद्र (२१:१६)
करण
 वणिज (७:३५), बव (२८:३७)

विनायक चतुर्थी

एक तिथि व्रत. प्रत्येक महिन्यातील शुद्ध चतुर्थीला हे नाव आहे. ही मध्यान्ह काल व्यापिनी घेतात. दोन दिवस ही चतुर्थी असल्यास पहिली घेतात. ही तृतीया युक्त असल्यास अधिक चांगली. या दिवशी गणेशपूजा हा प्रधान विधी असतो. मुख्यत: गाणपत्य संप्रदायाचे अनुयायी हे व्रत करतात. चतुर्थीला संपूर्ण उपवास करून दुसर्‍या दिवशी पारणे करतात.

भद्रा

७:३५ नंतर १८:०३ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

अविघ्नकर व्रत

हे एक काम्य व्रत आहे. फाल्गुन शुक्ल चतुर्थीस सुवर्णाच्या गणेश मूर्तीची पूजा, तिलहवन, तिलदान, तिलपदार्थांचे भोजन असा याचा विधी आहे. असे चार महिने प्रत्येक शुक्ल चतुर्थीस करावे. मग मूर्तींचे दान करावे.

फल - विघ्ननाश.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Thursday, 10 March 2016

दिनविशेष - ११ मार्च २०१६

तिथी
 फाल्गुन शुक्ल ३ (२१:१२) 
वार
 शुक्रवार     
नक्षत्र
 रेवती (१५:४२)
योग
 ब्रह्मा (२४:५८)
करण
 तैतिल (१०:५२)

मुस्लीम जमादिलाखर मासारंभ

मुस्लीम कालगणनेनुसार जमादिलाखर मास आरंभ होत आहे.


अमृत योग

१५:४२ पर्यंत शुक्रवारी रेवती नक्षत्र असल्यामुळे अमृतसिद्धी योग होत आहे. हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो. 
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.

गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Wednesday, 9 March 2016

दिनविशेष - १० मार्च २०१६

तिथी
 फाल्गुन शुक्ल २ (२४:३४) 
वार
 गुरुवार     
नक्षत्र
 उत्तराभाद्रपदा (१८:२१)
योग
 शुभ (८:५४), शुक्ल (२८:५३)
करण
 बालव (१४:१८)

ग्रहण करिदिन

ग्रहण दिवस, होळी, आयन दिन (उत्तरायण आणि दक्षिणायनाचा दिवस), भावुका अमावास्या व प्रेतदाहविधीचा दिवस अशा ५ प्रकारच्या दिवसांच्या दुसऱ्या दिवसाला करिदिन म्हणतात. हे ५ दिवस व त्यापुढचा म्हणजे करिदिन सर्व शुभ कार्याला वर्ज समजले जातात.
९ मार्च ला खग्रास सुर्यग्रहण असल्याने हा त्या नंतरचा दिवस म्हणून ग्रहण करिदिन आहे.

चंद्रदर्शन

अमावास्येला दिसेनासा झालेला चंद्र रविच्या पुढे १२ अंश गेला कि चंद्रदर्शन होते. २०:१८ ला पश्चिमेला

चंद्रदर्शन होईल. सामुदायिक मुहूर्त ३० म्हणजे साम्यार्घ आहेत. उत्तरशृंग आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Monday, 7 March 2016

दिनविशेष - ९ मार्च २०१६

तिथी
 माघ अमावास्या (७:२५), फाल्गुन शुक्ल १ (२८:०१) 
वार
 बुधवार     
नक्षत्र
 पूर्वाभाद्रपदा (२१:०२)
योग
 साध्य (१२:५४)
करण
 किंस्तुग्ध्न (१७:४४)

खग्रास सूर्यग्रहण (ग्रस्तोदित)

भारत, श्रीलंका, नेपाळसह पूर्व आशिया, चीनचा दक्षिणेकडील प्रदेश, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, अलास्का आणि कॅनडाचा पश्चिमेकडील काही प्रदेश, पॅसिफिक आणि हिंदी महासागर या प्रदेशात हे ग्रहण दिसणार आहे.

हे ग्रहण खग्रास असले तरी भारतात हे ग्रहण खंडग्रास दिसणार आहे. भारतात ग्रस्त झालेले सूर्यबिंब उदयास येईल. म्हणून भारतामध्य़े हे ग्रहण ग्रस्तोदित स्वरुपाचे असेल. भारताच्या पश्चिमेकडील काही प्रदेशामध्ये हे ग्रहण दिसणार नाही.

पुण्यकाल

सूर्योदयापासून ग्रहणमोक्षापर्यंतचा काल पुण्यकाल आहे.

ग्रहणाचे वेध

ग्रस्तोदित ग्रहण असल्याने सूर्योदयाच्या चार प्रहर आधी म्हणजेच 8 मार्च मंगळवारच्या सूर्यास्तापासून ग्रहण मोक्षापर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत. बाल, आजारी, अशक्त व्यक्तींनी आणि गर्भवती स्त्रीयांनी मंगळवारी रात्री ९ पासून वेध पाळावेत. ज्या प्रदेशात ग्रहण दिसत नाही अशा प्रदेशांत ग्रहणाचे नियम पाळण्याची आवश्यकता नाही.
सूर्यग्रहण असल्याने प्रत्येक गावाची स्पर्श, मध्य, मोक्ष वेळ ही वेगवेगळी असते आणि 9 मार्च च्या
सूर्यग्रहणाचा स्पर्श व मध्य सूर्योदयापूर्वी असेल.

ग्रहणातील कृत्ये

ग्रहणवेध काळ आणि ग्रहण पर्वकाळ ( पुण्यकाळ ) यामध्ये फरक आहे.
वेधकाळाचा कालावधी मोक्षवेळेपर्यंत ( साधारण पणे 12 तासापेक्षा जास्ती )  असतो आणि पर्वकाळ (सुमारे 5 मिनिटापासून 2ते 3 तासापर्यंत असतो).
वेधकाळात भोजन निषेध असल्याने याकाळात अन्नपदार्थ खाऊ नयेत मात्र इतर आवश्यक असे जलपान, मलमूत्रोत्सर्ग, निद्रा अशा गोष्टी करता येतात परंतु या गोष्टी ग्रहण पर्वकाळात करता येत नाहीत.  ग्रहण पर्वकाळात स्नान, पूजा, जप, दान इ, कर्मे करावीत.

मंत्र-तंत्र पुरश्चरणासंबंधी

नवीन मंत्र घेण्यास व गृहीत मंत्राचे पुरश्चरण करण्यास सूर्यग्रहण हा मुख्यकाल आहे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहणकालामध्ये केल्याने मंत्रसिद्धी होते.

स्नानाविषयी

ग्रहणात सर्व उदक गंगेसामान आहे. तरीही उष्णोदकाहून शीतोदक पुण्यकारक. पाणी वर काढून स्नान करण्यापेक्षा वाहते पाणी, सरोवर, नदी, महानदी, गंगा समुद्र यांचे स्नान उत्तरोत्तर श्रेष्ठ व पुण्यकारक आहे. सूर्यग्रहणात नर्मदा स्नानाचे विशेष महत्व सांगितले आहे. नर्मदा स्नान शक्य नसल्यास स्नानाचे वेळी नर्मदेचे स्मरण करावे.

ग्रहणाचे राशीपारात्वे फळ

मेष, वृषभ, कन्या, धनु या राशींना शुभ फळ आहे.
मिथुन, सिंह, तुला, मकर या राशींना मिश्र फळ आहे.
कर्क, वृश्चिक,कुंभ आणि मीन या राशींना अनिष्ट फळ आहे.
ज्यांना अनिष्ट फल आहे त्यांनी आणि गरोदर स्त्रियांनी हे ग्रहण पाहू नये.

इष्टि

इष्टि  म्हणजे यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Wednesday, 2 March 2016

दिनविशेष - ८ मार्च २०१६

तिथी
 माघ कृष्ण १४ (१०:३४) 
वार
 मंगळवार     
नक्षत्र
 शततारका (२३:३६)
योग
 सिद्ध (१६:४४)
करण
 चतुष्पाद (२१:०२)

दर्श अमावास्या

अमावस्या ही पर्वतिथी आहे. यावेळी जप,तप, दान, अथवा व्रत केले असता अधिक फलप्राप्ती होते. या तिथीस श्राद्ध केले असता पितर तृप्त होतात.
दर्शश्राद्ध : दर्शाच्या दिवशी केले जाणारे श्राद्ध पितृत्रयी, मातृत्रयी व मातामहत्रयी यांना उद्देशून करतात. हे श्राद्ध नेहमीच्या श्राद्धासारखेच असते.

युगादि

ज्या तिथीला नवीन युगाचा आरंभ झाला त्या तिथीला युगादि असे म्हणतात. ४ युगांच्या आरंभीच्या ४ तिथी पुढील प्रमाणे आहेत.
१)
कृतयुग
 कार्तिक शुक्ल ९
२)
त्रेतायुग
 वैशाख शुक्ल ३
३)
द्वापारयुग
 माघ कृष्ण अमावास्या
४)
कलियुग
 भाद्रपद कृष्ण १३

मृत्यु योग

२३:३६ पर्यंत मंगळवारी शततारका नक्षत्र असल्यामुळे मृत्यु योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त



अन्वाधान

अग्नी हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ष्टिच्या च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.

क्षयतिथी

ज्या तिथीला कोणताही सूर्योदय होत नाही ति क्षय तिथी असते.
लागोपाठच्या दोन सूर्योदयाच्या वेळी एकचतिथी असेल तर तिला तिथी वृद्धी म्हणतात.

क्षय तिथी, वृद्धी तिथी, कृ. १३, कृ १४, अमावास्या व शु. १ या सहा तिथी शुभ कार्यासाठी पूर्णपणे अशुभ सांगितलेल्या आहेत.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट