Sunday, 8 May 2016

दिनविशेष - ९ मे २०१६


तिथी
 वैशाख शुक्ल ३ (१४:५२)  
वार
 सोमवार     
नक्षत्र
 मृग (२४:०९)
योग
 सुकर्मा (२६:०२)
करण
 वणिज (२५:३६)

अक्षय्य तृतीया

अक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी दान, होम, जप व पितरांचे तर्पण करतात.या दिवशी जप, दान, होम इ. केले असता ते अक्षय्य होते असे मानले जाते. या दिवशी आपणांस अत्यंत प्रिय असेल ते दान करावे.

या दिवशी रोहिणी नक्षत्र व बुधवार असा योग असेल तर तो महापुण्यकारक असतो.

गौरीहर दोलोत्सव समाप्ति

गौरीहर दोलोत्सावाची या दिवशी सांगता होते. म्हणून स्‍त्रिया या दिवशी हळदीकुंकू करून सुवासिनींना भोजनास बोलावून त्यांचा सत्कार करतात. कैरीची डाळ, कैरीचे पन्हे, नारळाची करंजी देतात. या शिवाय बत्तासे, मोगर्‍याची फुले किंवा गजरे देतात आणि भिजवलेली हरबर्‍यांनी ओटी भरतात.

तिसरी तीज


श्री बसवेश्वर जयंती

समाजसुधारक बसवण्णा/बसवा/बसवेश्वर यांचा जन्म म्हैसूर (आजचा कर्नाटक) राज्यातील विजापूर जिल्ह्यातल्या बागेवाडी या तालुक्यात कम्मेकुळ या गावात, वैशाख शुद्ध तृतीया इ.स. ११३४ रोजी झाला. (जन्म : ३० मार्च, इ.स. ११३४ - मृत्यू : इ.स. ११६७) त्यांचे वडील मादीराज आणि माता मादलांबिका.
हे कर्नाटकातील संत व समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध व अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी निर्गुण, निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला. बसवेश्वरांनी घालून दिलेल्या मार्गाला लिंगायत पंथ या नावाने ओळखले जाते.
बसवण्णांनी मंगळवेढा येथे "जगातील पहिली लोकशाही संसद म्हणजेच 'अनुभव मंडपाची' स्थापना केली. या अनुभव मंडपात सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणींवर कशी मात करावी यावर चर्चा करण्याचे कार्य चालत असे. बसवण्णांनी समाजातील रूढीपरंपरा, वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजाच्या हितकारक गोष्टींची अंमलबजावणी करणारी नवीन यंत्रणा तयार केली. अनुभव मंडप म्हणजे जगातील पहिली संसद.

कल्पादि

ब्रह्मदेवाच्या  दिवसाच्या आरंभाची जी तिथी असते तिला कल्पादि असे म्हणतात. पुढील सात तिथी कल्पादि आहेत.
१)      चैत्र - शुक्ल ५,
२)      चैत्र – कृष्ण ५
३)      वैशाख – शुक्ल ३
४)      कार्तिक - शुक्ल ७
५)      मार्गशीर्ष – शुक्ल ९
६)      माघ – शुक्ल १३
७)      फाल्गुन – शुक्ल ३
धर्मसिंधु ग्रंथात चैत्र कृष्ण ५ न सांगता चैत्र शुक्ल प्रतिपदा सांगितली आहे.

युगादि

ज्या तिथीला नवीन युगाचा आरंभ झाला त्या तिथीला युगादि असे म्हणतात. ४ युगांच्या आरंभीच्या ४ तिथी पुढील प्रमाणे आहेत.
१)
कृतयुग
 कार्तिक शुक्ल ९
२)
त्रेतायुग
 वैशाख शुक्ल ३
३)
द्वापारयुग
 माघ कृष्ण अमावास्या
४)
कलियुग
 भाद्रपद कृष्ण १३

जलकुंभ व पंखादान

मातीचे दोन घट पाण्याने भरून एकात तांदूळ व दुसर्यात तील घालून त्यांना दोरा गुंडाळावा व ते धान्यावर ठेवावेत. ब्रह्मा-विष्णु-शिव स्वरूपात त्यांची पूजा करून दान करावे. म्हणजे पितर तृप्त होतात आणि मनोरथ पूर्ण होतात.

शुक्र लोप

पूर्व दिशेला शुक्राचा अस्त होत आहे.
ग्रहांचे सूर्य सानिध्यामुळे अदर्शन होते. यालाच ‘अस्त’ असे म्हणतात. आणि तोच ग्रह सूर्यापासून ठराविक अंतारावर गेला कि त्याचे दर्शन आपल्याला पूर्वेस अथवा पश्चिमेस होऊ लागते. त्याला ‘उदय’ असे म्हणतात.
सूर्यापासून प्रत्येक ग्रह जितक्या अंशावर असता आपल्याला त्याचे दर्शन होऊ शकते म्हणजेच ग्रहाचा उदय होतो, त्याला त्या ग्रहाचे ‘कालांश’ असे संबोधतात.
ग्रह आणि त्यांचे कालांश :
बुध
१३
वक्री बुध
१२
शुक्र
वक्री शुक्र
७||
मंगळ
१७
गुरु
११
शनी
१५

शुक्र हा अतिशय तेजस्वी आहे. पहाटे सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावर किंवा सायंकाळी सुर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर सुमारे तीन तासापर्यंत दिसू शकतो.
शुक्र हा शुभग्रह असल्यामुळे तो अस्तंगत असताना अनेक शुभ कार्यांना वर्ज असतो.
अस्त होण्यापूर्वी काही दिवस त्याच्या तेजाच्या वार्धक्याचे व उदयानंतर काही दिवस तेजाच्या बालात्वाचे म्हणूनही धर्म कार्यात वर्ज सांगितले आहेत.
बालत्व / वृद्धत्व
दिशा
दिवस
बालत्व
पूर्वेस उदय
१५ / १० / ७ / ५ / ३ दिवस
बालत्व
पश्चिमेस उदय
१५ / १० / ७
वृद्धत्व
पूर्वेस अस्त
१५ / १० / ७
वृद्धत्व
पश्चिमेस अस्त
१५ / १०/ ७ / ५

अमृत योग

२४:०९ पर्यंत सोमवारी मृग नक्षत्र असल्यामुळे होणारा अमृतसिद्धी योग होत आहे. हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो. 
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज

भद्रा

२५:३६ नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

मुस्लीम शाबान मासारंभ


मुस्लीम कालगणनेनुसार शाबान मास आरंभ होत आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

Saturday, 7 May 2016

दिनविशेष - ८ मे २०१६


तिथी
 वैशाख शुक्ल २ (१७:५१)  
वार
 रविवार     
नक्षत्र
 रोहिणी (२६:०७)
योग
 शोभन (९:०२), अतिगंड (२९:१८)
करण
 बालव (७:३२), तैतिल (२८:१८)

श्री परशुराम जयंती

ज्या दिवशी रात्रीच्या प्रथम प्रहरात वैशाख शुक्ल तृतीया असेल, त्या दिवशी प्रदोष काळी परशुराम जयंती साजरी केली जाते.

परशुराम हे भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात. जमदग्नीरेणुकामाता यांच्या पोटी यांचा जन्म झाला. धारिणीशी विवाह केला. ब्राह्मण असून क्षत्रियांचे सर्व गुण यांच्यात होते, म्हणूनच त्यांना "शरादपि शापादपि" असे म्हणतात. भगवान शंकरांकडून त्यांनी परशू हे शस्त्र घेतले आणि अनेक विद्या आत्मसात केल्या. त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला जाच करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला. त्याच वेळी त्यांनी सहस्रार्जुनाला ठार केले. पुढे राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन त्यांनी ऋषिकुलाला देऊन ते महेन्द्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले. यांच्या दानशिलतेवर प्रसन्न होऊन विष्णूने यांचा द्वारपाल होणे पसंत केले.

कोकण प्रदेशाची निर्मितीच्या कथाही तेवढ्याच रंजक आहेत. असे म्हणतात की कोकणाच्या भूप्रदेशाची निर्मिती परशुरामाने समुद्र ४०० योजने मागे हटवून केली आहे. म्हणूनच परशुरामाला सप्त कोकणांचा देव म्हणतात. संपूर्ण भारतात समुद्रालगतच्या राज्यांमध्ये परशुरामाची ही कथा सांगितली आणि ऐकली जाते. त्यामुळे संपूर्ण भारतभर परशुराम क्षेत्रे आहेत.

केरळची भूमी परशुरामाने निर्माण केली असे सांगतात.. तिथेही एक परशुराम क्षेत्र आहे. ओरिसा, आसाम, गुजरात आणि पंजाबमध्येही परशुराम क्षेत्र आहे. तसेच ते कोकणातही आहे. परशुराम हा अमर्त्य किंवा चिरंजीव मानला गेला आहे. त्यामुळे त्याचा कायम निवास असतो असा समज आहे.

श्री विष्णू अवतार

मत्स्य अवतार
चैत्र शुक्ल तृतीया
अपराह्नकाळी
कूर्म अवतार
वैशाख पौर्णिमा
सायंकाळी
वराह अवतार
भाद्रपद शुक्ल तृतीया
अपराह्नकाळी
नृसिंह अवतार
वैशाख शुक्ल चतुर्दशी
सायंकाळीं
वामन अवतार
भाद्रपद शुक्ल द्वादशी
माध्यान्हकाळी
परशुराम अवतार
वैशाख शुक्ल तृतीया
माध्यान्हकाळीं झाला. (हा प्रदोषकाळी झाला असे अन्य मत असून सध्या प्रचार ही प्रदोषकाळी मानण्याविषयीच आहे. )

राम अवतार
चैत्र शुक्ल नवमी
माध्यान्हकाळी
कृष्ण अवतार
श्रावण कृष्ण अष्टमी
मध्यरात्री
बौध्द अवतार
अश्विन शुक्ल दशमी
सायंकाळी
कल्की अवतार
श्रावण शुक्ल षष्ठी
सायंकाळी


चंद्रदर्शन


अमावास्येला दिसेनासा झालेला चंद्र रवीच्या पुढे १२ अंश गेला कि दिसू लागतो. २०:५२ ला पश्चिमेला चंद्र दर्शन होईल. सामुदायिक मुहूर्त ४५ म्हणजे समर्घ आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

Friday, 6 May 2016

दिनविशेष - ७ मे २०१६


तिथी
 वैशाख शुक्ल १ (२१:१७)  
वार
 शनिवार     
नक्षत्र
 भरणी (७:२५), कृत्तिका (२८:३५)
योग
 सौभाग्य (१३:०४)
करण
 किंस्तुग्ध्न (११:०७)

अमृत योग

२८:३५ नंतर शनिवारी रोहिणी नक्षत्र आल्यामुळे होणारा प्रयाणासाठी वर्ज असणारा अमृतसिद्धी योग होत आहे. हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो. 
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज

इष्टी

इष्टि  म्हणजे यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

Thursday, 5 May 2016

दिनविशेष - ६ मे २०१६


तिथी
 चैत्र अमावास्या (२५:००)  
वार
 शुक्रवार     
नक्षत्र
 अश्विनी (१०:२३)
योग
 आयुष्यमान (१७:१६)
करण
 चतुष्पाद (१४:५३)

दर्श अमावास्या

अमावस्या ही पर्वतिथी आहे. यावेळी जप,तप, दान, अथवा व्रत केले असता अधिक फलप्राप्ती होते. या तिथीस श्राद्ध केले असता पितर तृप्त होतात.
दर्शश्राद्ध : दर्शाच्या दिवशी केले जाणारे श्राद्ध पितृत्रयी, मातृत्रयी व मातामहत्रयी यांना उद्देशून करतात. हे श्राद्ध नेहमीच्या श्राद्धासारखेच असते.

अन्वाधान

अग्नी हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.

ष्टिच्या च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट