Thursday, 27 August 2015

दिनविशेष - २८ ऑगस्ट २०१५

तिथी
 श्रावण शु १३ (६:४८), श्रावण शु १४ (२७:३५)
वार
 शुक्रवार
नक्षत्र
 श्रवण (१८:०७)
योग
 शोभन (२१:५५)
करण
 गरज (१७:१४)

वरदलक्ष्मीव्रत

या व्रताच्या विधी मध्ये एक कलश ठेऊन त्यामध्ये श्री वरदलक्ष्मीला आवाहन करतात. श्रीसूक्त पठण करून देवीची षोडशोपचारे पूजा करतात.  यानंतर २१ अनारशांचा नैवेद्य देवीला अर्पण करतात. त्यानंतर ब्राह्मण, सुवासिनी आणि ब्रह्मचारी यांना उपायान अर्थात भेंटवस्तु देतात. असे मानले जाते कि  कि दक्षिण भारतात तिरुवादी, तिरुवायुर आणि तिरुपुत्तुर येथील मंदिरात लक्ष्मीने स्वत: शंकराची  पूजा केली होती. म्हणून या व्रतात या मादिराना  विशेष महत्व आहे. या व्रताचे फल पुत्रप्राप्ति, समृद्धि आणि धनधान्य प्राप्ति असे आहे.

क् श्रावणी


घबाड

६:४८ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: मघा
चंद्र नक्षत्र : श्रवण
तिथी: १३
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १३
१३ x ३ = ३९
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १३ तिथी मिळवू : ३९+१३ = ५२
आता ७ ने भागू  ५२ / ७ = ७ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

भद्रा

२७:३५ नंतर भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

क्षयतिथी

ज्या तिथीला कोणताही सूर्योदय होत नाही ति क्षय तिथी असते.
लागोपाठच्या दोन सूर्योदयाच्या वेळी एकचतिथी असेल तर तिला तिथी वृद्धी म्हणतात.
क्षय तिथी, वृद्धी तिथी, कृ. १३, कृ १४, अमावास्या व शु. १ या सहा तिथी शुभ कार्यासाठी पूर्णपणे अशुभ सांगितलेल्या आहेत.

श्रावणी शुक्रवार

दर शुक्रवारी जरा जीवंतिका पूजन करावे.


संदर्भ
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

दिनविशेष - २७ ऑगस्ट २०१५

तिथी
 श्रावण शु १२ (९:३२)
वार
 गुरुवार
नक्षत्र
 उत्तराषाढा (२०:१९)
योग
 सौभाग्य (२५:३३)
करण
 कौलव (२०:१४)

प्रदोष

सूर्यास्तानंतर पुढे ३ मुहूर्त (म्हणजे मध्यम मानाने  साधारण २ तास २४ मिनिटे ) प्रदोष काळ असतो.
प्रत्येक चांद्र मासात प्रदोष काळी जेव्हा त्रयोदशी असेल त्या दिवशी प्रदोष निमित्त उपास करतात.
कामनाभेद ' हा या व्रताचा विशेष आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला हे व्रत करावे. याप्रमाणे एक वर्षभर करावे. व्रतादिवशी प्रात: स्नान करुन ' मम पुत्रादिप्राप्तिकामनया प्रदोषव्रतमहं करिष्ये ' इ. संकल्प करून व्रतारंभ करावा. सायंकाळी पुन्हा स्नान करावे. श्रीशंकराचे पुढे बसून वेदपाठी ब्राह्मणाज्ञेप्रमाणे पुढील मंत्राने प्रार्थना करावी व षोड्शोपचारे पूजा करावी.
भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥
उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे । ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥
भाजलेले सातूचे पीठ , तूप व साखरेचा नैवेद्य अर्पण करावा. याप्रमाणे करून तेथेच आठ दिशांना आठ दिवे प्रज्वलित करावेत व प्रत्येक दिवा लावताना आठ वेळा नमस्कार करावा. ' धर्मस्त्वं वृषरूपेण ' या मंत्राने नंदिकेश्वराला पाणी दुर्वा आदि देऊन त्याची पूजा करावी व त्याला स्पर्श करुन ' ऋणरोगादि' या पूर्ण मंत्राने शंकर , पार्वती आणि नंदिकेश्वराची प्रार्थना करावी. हे व्रत विशेषत: स्त्रियांनी करण्याचे आहे. नंदीच्या शेपूट व शिंगे आदींच्या स्पर्शाने अभीष्टसिद्धी होते.
Ø  सोमवार: शांतीरक्षणासाठी सोम प्रदोष करावा.
Ø  मंगळवार: ऋणमुक्त होण्यासाठी भौम प्रदोष करावा.
Ø  शुक्रवार: सौभाग्य किंवा स्त्री-समृद्धीची इच्छा असेल तर शुक्रवारी हे व्रत करावे.
Ø  शनिवार: पुत्र प्राप्तीसाठी शनिप्रदोष वर्षभर किंवा फलप्राप्ती होई पर्यंत करावा. 
Ø  रविवार: आयुर्दायासाठी अर्कप्रदोष हे व्रत करावे.

शाकदान-दधिव्रत

श्रावण शु. द्वादशी दिवशी दधिव्रत करतात. त्यावेळी दह्याचा उपयोग करतात. जर त्या दिवशी विमानारूढ भगवान श्रीधराची पूजा करून अहोरात्र आनंदोत्सव केला तर पंचयज्ञासमान फळ मिळते.

पंचमहापापनाशन व्रत

हे एक व्रत श्रावण शु. द्वादशीला आणि पौर्णिमेला श्रीकृष्णाच्या जगन्नाथ, देवकीसुत इ. बारा रूपांची पूजा करतात आणि या महिन्याच्या अमावस्येला ब्राह्मणांना तीळ, मूग, गूळ, भात, इ. पदार्थांचे भोजन घालतात. त्यावेळी पंचरत्‍ने दान देतात.
फल - पंचमहापातकांपासून मुक्‍त.

घबाड

२०:१९ नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: मघा
चंद्र नक्षत्र : श्रवण
तिथी: १३
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १३
१३ x ३ = ३९
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १३ तिथी मिळवू : ३९+१३ = ५२
आता ७ ने भागू  ५२ / ७ = ७ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

श्रावणी गुरुवार


दर गुरुवारी बुध-बृहस्पति पूजन करावे.

संदर्भ
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Tuesday, 25 August 2015

दिनविशेष - २६ ऑगस्ट २०१५

तिथी
 श्रावण शु ११ (११:४१)
वार
 बुधवार
नक्षत्र
 पूर्वाषाढा (२१:५९)
योग
 प्रिती (७:२८), आयुष्यमान (२८:४६)
करण
 बव (२२:४१)

पुत्रदा एकादशी / शुक्लैकादशी

श्रावण शु. एकादशी पवित्रा, पुत्रदा व पापनाशिनी असते. यासाठी आदले दिवशी दुपारी हविष्यान्न एकवेळ घ्यावे (एकभुक्त) एकादशी दिवशी प्रात:स्नानादी कर्मे झाल्यावर
'मम समस्त दुरितक्षयपूर्वकं श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं श्रावण शुक्लैकदशीव्रतमहं करिष्ये ।'
असा संकल्प सोडून भक्तिभावपुर्वक व यथाविधी परमेश्‍वराची पूजा करावी. अनेक प्रकारची फुले, फळे पत्री आणि नैवेद्य देऊन आरती करावी. त्यानंतर रात्रीच्या वेळी गायन, वादन, नर्तन, कीर्तन आणि कथाश्रवण यांत रात्रभर जागरण करावे. दुसरे दिवशी पारणे करून यथाशक्ती ब्राह्मणभोजन घालून मग स्वत: जेवावे. यामुळे पापाचा नाश होऊन पुत्रादी प्राप्ती होते.

पवित्रार्पण विधी

श्रावण शु. एकादशीला देवाला पवित्रक अर्पण करतात. जरी सामान्यत: बाजारात मिळणार्‍या सुताचे वा रेशमाचे पवित्रक करतात, तरी शास्त्रात त्याचे वेगळे विधान आहे. त्याप्रमाणे मणी, रत्‍न, सोने, चांदी, तांबे, रेशीम, सूत, त्रिसर, पद्मसूत्र, कुशा, मुंज, कापूस अगर अन्य प्रकारापासून पवित्र करावे अगर सुवासिनी स्त्रीकडून सूत कातवून त्याच्या तीन दोर्‍यांचा त्रिगुणाने करून त्यापासून बनवावे. रेशमाचे पवित्रक असेल तर त्यात आंगठ्याच्या पेराप्रमाणे यथाशक्ती ३६०, २७०, १८०, १०८, ५४ , अगर २७ गाठी घालाव्यात. त्याची लांबी गुडघा, मांडी अगर बेंबीपर्यंत ठेवून त्यावर पंचगव्य प्रोक्षण करून त्याला स्वच्छ पाण्याने धुवावे. नंतर
'' नमो नारायणाय'
चा १०८ वेळा जप करून शंखोदक शिंपडावे आणि रात्रभर ठेवून व्रताच्या दुसर्‍या दिवशी धारण करावा. त्यावेळी तुपाने भिजलेल्या दोन वाती अगर कापूर पेटवून आरती करावी. आणि
'मणि -विद्रुममालाभिर्मंन्दारकुसुमदिभि: । इयं संवत्सरी पूजा तवास्तु गरूडध्वज ॥' 'वनमाला यया देव कौस्तुभं सततं ह्रदि । पवित्रमस्तु ते तद्वत्पूजां च ह्रदये वह '
असा श्लोक म्हणून नमस्कार करावा. सत्ययुगात रत्‍नांचे, त्रेतायुगात सोन्याचे, द्वापार युगात रेशमाचे व कलियुगात सुताचे पवित्र धारण करणे योग्य होय.

घबाड

११:४१ ते २१:५९ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: मघा
चंद्र नक्षत्र : पूर्वाषाढा
तिथी: १२
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११ x ३ = ३३
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १२ तिथी मिळवू : ३३+१२ = ४५
आता ७ ने भागू  ४५ / ७ = ६ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

भद्रा

११:४१ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

श्रावणी बुधवार

दर बुधवारी बुध-बृहस्पति पूजन करावे.

संदर्भ
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

दिनविशेष - २५ ऑगस्ट २०१५

तिथी
 श्रावण शु १० (१३:०५)
वार
 मंगळवार
नक्षत्र
 मूळ (२२:५९)
योग
 विष्कंभ (९:३३)
करण
 वणिज (२४:२९)

भद्रा

२४:२९ नंतर भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

श्रवणी मंगळवार


दर मंगळवारी मंगळागौरी पूजन करावे.

मंगळागौरी पूजन

सुवासिनी नवविवाहित स्त्रियांनी श्रावणातील प्रत्येक मंगळवारी आचरावयाचे सौभाग्यदायी मंगळागौरी ह्या देवतेचे एक व्रत. या व्रतात शिव आणि गणपतीसह गौरीची पूजा करतात. लग्नानंतर पहिली पाच वर्षे किंवा सात वर्षे हे व्रत पाळल्यानंतर या व्रताचे उद्यापन करतात.



सुवासिनी स्त्री श्रावणातल्या मंगळवारी आपल्या विवाहित मैत्रिणींसह शिवासमवेत असलेल्या गौरीची पूजा करते. पहिल्या वर्षी माहेरी मातृगृही हे व्रत करण्याची प्रथा आहे. हे व्रत विशेषतः महाराष्ट्रीय ब्राह्मण स्त्री वर्गात विशेषतः आचरले जाते. बरोबरीच्या विवाहित मैत्रिणी (यांना वसोळ्याम्हणतात) एकत्र जमून मंगळागौर रात्रभर जागवितात. निरनिराळे खेळ, गाणी, उखाणे इत्यादींनी मजेत दिवस व रात्र घालवितात व दुसरे दिवशी पहाटे पूजा-आरती करून सांगता करतात. हे व्रत सौभाग्यवती स्त्रियांकरिता आहे. जय जय मंगळगौरीम्हणून

सोळा वातींची मंगल आरती भक्तिभावाने सुवासिनी स्त्रिया करतात आणि नंतर हातात तांदूळ घेऊन बसतात व मंगळागौरीची कहाणी ऐकतात. ती कहाणी तात्पर्याने अशी : सुशीला नावाच्या एका साध्वीस मंगळागौरी प्रसन्न झाली व पुढे तिला वैधव्य प्राप्त झाले असताना मंगळागौरीने यमदूतांशी युद्ध करून तिच्या पतीचे प्राण परत आणले आणि तिला अखंड सौभाग्यवती केले. मंगळागौरीच्या भक्तिपूर्वक केलेल्या पूजेचे हे फल होय. ही कहाणी ऐकल्यावर सुवासिनी हातातील तांदूळ देवीला वाहतात. दुपारी मौन आचरून भोजन करतात.
मंगळागौरीची पूजा म्हणजे उमा-शंकराची पूजा. पतीपत्नीमधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून या दांपत्याकडे पाहिले जाते. त्यांची कृपादृष्टी संपादन करण्यासाठी किंवा आदर्शाचे स्मरण करण्याच्या हेतूने ही पूजा करतात. लग्न झाल्यावर पहिली पाच वर्षे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी स्त्रिया मंगळागौरीची पूजा करतात.पाच अथवा सात व्रते केल्यावर उद्यापन करतात.

मंगळागौरीची कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लखम्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही,” असे म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली. त्यानं तिला युक्ति सांगितली. दाराच्या आड लपून बस, अल्लख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल”. अशी भिक्षा झोळीत घातली. बोवाचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाही असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बोवांनी उःशाप दिला. बोवा म्हणाले, “आपल्या नवऱ्याला सांग. निळ्या घोड्यावर बस. निळा वस्त्रं परिधान कर. रानांत जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल”. असं बोलून बोवा चालता झाला.
तिनं आपल्या पतीला सांगितलं. वाणी रानांत गेला. घोडा अडला, तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरेजडिताचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आत देवीची मूर्ती आहे. मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली, “वर मागम्हणाली. घरदार आहे, गुरंढोरं आहेत. धन द्रव्य आहे; पोटी पुत्र नाही, म्हणून दुःखी आहे.देवी म्हणाली, “तुला संततीचं सुख नाही, मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे”. त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं माझ्या मागच्या बाजूस जा. तिथं एक गणपती आहे. त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे, गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईलअसं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली.
वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला, पोटभर आंबे खाल्ले, मोटभर घरी नेण्याकरिता घेतले. खाली उतरून पाहू लागला, तो आपल्या मोटेत आंबा एकच आहे. असं चार पाच वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, “तुझ्या नशिबी एकच फळ आहे”. फळ घेऊन घरी आला, बायकोला खाऊ घातलं, ती गरोदर राहिली. दिवसमासा गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासा वाढू लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी लग्न कराम्हणाली. काशीयात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे, असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं. मामाभाचे काशीला जाऊ लागले. जाता जाता काय झालं? वाटेनं एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यांत एकमेकीचं भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, “काय रांड द्वाड आहे! काय रांड द्वाड आहे! तेव्हा ती मुलगी म्हणाली, “माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे”. हे भाषण मामानं ऐकलं त्याच्या मनांत आलं हिच्याशी भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हे घडतं कसं? त्याच दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला.
इकडे काय झालं? त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा आजारी झाला. मुलाच्या आईबापांना पंचाईत पडली. पुढं कोणी तरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करू, म्हणून धर्मशाळा पाहू लागले. मामाभाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लाविलं. उभयतांना गौरीहरापाशी निजवलं. दोघं झोपी गेली. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. अगं अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरितां दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कऱ्यांत शिरेल. आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे”. तिनं सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणं घडून आलं. काही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बिऱ्हाडी गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले.
दुसरे दिवशी काय झालं? हिनं सकाळी उठुन स्नान केलं, आपल्या आईल वाण दिलं. आई उघडून पाहू लागली, तो आत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यांत हार घातला. पुढं पहिला वर मांडपांत आला. मुलीला खेळायला आणलं. ती म्हणाली, “हा माझा नवरा नाही. मी त्याचे बरोबर खेळत नाही”. रात्रीची लाडवांची व अंगठीची खूण काही पटेना. आईबापाला पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडतो? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावानं गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला, शेकडो लोक येऊन जेवू लागले.
इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी झाली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथं अदृश्य झाली. भाचा जागा झाला, तसा आपल्या मामाला सांगू लागला, “मला असं असं स्वप्न पडलं”. मामा म्हणाला, “ठीक झालं. तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ.परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितलं, “इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा”. ते म्हणाले, “आम्ही परान्न घेत नाही”. दासींनी यजमानणीस सांगितलं. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवऱ्याला ओळखलं. नवऱ्यानं अंगठी ओळखली. आईबापांनीं विचारलं. तुझ्याजवळ खूण काय आहे?” त्यानं लाडवांचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरी आले. सासूनं सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळं माझा मुलगा वाचलाअसं म्हणाली. तिनं सांगितलं. मला मंगळागौरीचं व्रत असतं. ही सगळी तिची कृपा”. सासर माहेरची घरचीदारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं.
तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हा होवो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठां उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

संदर्भ
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट