तिथी
|
श्रावण शु १२ (९:३२)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
उत्तराषाढा (२०:१९)
|
योग
|
सौभाग्य (२५:३३)
|
करण
|
कौलव (२०:१४)
|
प्रदोष
सूर्यास्तानंतर पुढे ३ मुहूर्त (म्हणजे मध्यम
मानाने साधारण २ तास २४ मिनिटे ) प्रदोष
काळ असतो.
प्रत्येक चांद्र मासात प्रदोष काळी जेव्हा त्रयोदशी
असेल त्या दिवशी प्रदोष निमित्त उपास करतात.
‘कामनाभेद ' हा या व्रताचा विशेष आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला हे
व्रत करावे. याप्रमाणे एक वर्षभर करावे. व्रतादिवशी प्रात: स्नान करुन ' मम पुत्रादिप्राप्तिकामनया प्रदोषव्रतमहं करिष्ये ' इ. संकल्प करून व्रतारंभ करावा. सायंकाळी पुन्हा स्नान करावे. श्रीशंकराचे
पुढे बसून वेदपाठी ब्राह्मणाज्ञेप्रमाणे पुढील मंत्राने प्रार्थना करावी व
षोड्शोपचारे पूजा करावी.
भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥
उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे
। ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥
भाजलेले सातूचे पीठ , तूप व साखरेचा नैवेद्य अर्पण करावा. याप्रमाणे करून तेथेच आठ दिशांना आठ दिवे
प्रज्वलित करावेत व प्रत्येक दिवा लावताना आठ वेळा नमस्कार करावा. ' धर्मस्त्वं वृषरूपेण ' या मंत्राने नंदिकेश्वराला पाणी
दुर्वा आदि देऊन त्याची पूजा करावी व त्याला स्पर्श करुन ' ऋणरोगादि' या पूर्ण मंत्राने शंकर , पार्वती आणि नंदिकेश्वराची प्रार्थना करावी. हे व्रत विशेषत: स्त्रियांनी
करण्याचे आहे. नंदीच्या शेपूट व शिंगे आदींच्या स्पर्शाने अभीष्टसिद्धी होते.
Ø सोमवार: शांतीरक्षणासाठी सोम प्रदोष करावा.
Ø मंगळवार: ऋणमुक्त होण्यासाठी
भौम प्रदोष करावा.
Ø शुक्रवार: सौभाग्य किंवा
स्त्री-समृद्धीची इच्छा असेल तर शुक्रवारी हे व्रत करावे.
Ø शनिवार: पुत्र प्राप्तीसाठी
शनिप्रदोष वर्षभर किंवा फलप्राप्ती होई पर्यंत करावा.
Ø रविवार: आयुर्दायासाठी
अर्कप्रदोष हे व्रत करावे.
शाकदान-दधिव्रत
श्रावण शु. द्वादशी दिवशी दधिव्रत करतात. त्यावेळी दह्याचा
उपयोग करतात. जर त्या दिवशी विमानारूढ भगवान श्रीधराची पूजा करून अहोरात्र
आनंदोत्सव केला तर पंचयज्ञासमान फळ मिळते.
पंचमहापापनाशन व्रत
हे एक व्रत श्रावण शु. द्वादशीला आणि पौर्णिमेला
श्रीकृष्णाच्या जगन्नाथ, देवकीसुत इ. बारा रूपांची पूजा करतात आणि या
महिन्याच्या अमावस्येला ब्राह्मणांना तीळ, मूग, गूळ,
भात, इ. पदार्थांचे भोजन घालतात. त्यावेळी पंचरत्ने दान देतात.
फल -
पंचमहापातकांपासून मुक्त.
घबाड
२०:१९ नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही
धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी
मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: मघा
चंद्र नक्षत्र : श्रवण
तिथी: १३
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १३
१३ x ३ = ३९
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १३ तिथी मिळवू : ३९+१३ = ५२
आता ७ ने भागू
५२ / ७ = ७ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.
श्रावणी गुरुवार
दर गुरुवारी बुध-बृहस्पति पूजन करावे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment