तिथी
|
निज आषाढ कृ १ (१३:०८)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
श्रवण (७:४१) धनिष्ठा (२९:१८)
|
योग
|
आयुष्मान (११:०२)
|
करण
|
तैतिल (२३:३२)
|
अशून्यशयन व्रत
शेषशय्येवर असलेल्या श्रीवत्स चिन्हांकित ४ भुजांनी युक्त आणि लक्ष्मीसहित
विराजमान झालेल्या नारायणाची पूजा करावी, दिवसभर मौन पाळावे. चंद्रोदयानंतर अर्घ्य
देऊन भोजन करावे. या व्रताने घरावरील संकट टळते व अखंड सौभाग्य, सुख मिळते असे
भविष्य पुराणात सांगितले आहे. हे व्रत मार्गशीर्षापर्यंत प्रत्येक वद्य द्वितीयेस
करावे.
इष्टि
इष्टि म्हणजे
यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो
विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.
लोकमान्य टिळक पुण्यतिथी
जेष्ठ गणितज्ञ आणि पंचागकर्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे
देहावसान १ ऑगस्ट, १९२० रोजी झाले. त्यांच्या
प्रेरणादायी पुण्यस्मृतींना अभिवादन करण्यासाठी हा स्मुतीदिन साजरा केला जातो.
कालाष्टक
आषाढ कृष्ण प्रतिपदा ते अष्टमीपर्यंत या व्रताचा काळ असतो.
या काळात कालभैरवाचे भक्त त्याची पूजा व उपवास करतात आणि आठ ब्राह्मणांना भोजन
घालतात.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment