Sunday, 9 August 2015

दिनविशेष - ९ ऑगस्ट २०१५

तिथी
 निज आषाढ कृ १० (१६:५९)
वार
 रविवार
नक्षत्र
 रोहिणी (१८:३०)
योग
 ध्रुव (८:३१)
करण
 बव (२८:४९)

घबाड

१६:५९ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: आश्लेषा
चंद्र नक्षत्र : रोहिणी
तिथी: १५+१० = २५
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २३
२३ x ३ = ६९
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १५+१० = २५ तिथी मिळवू : ६९+२५ = ९४
आता ७ ने भागू  ९४ / ७ = १३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

भद्रा

१६:५९ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

अगस्ति दर्शन

१५ मे २०१५ रोजी अगस्ति या स्थिर ताऱ्याचा अस्त झाला होता. त्याचे आता आकाशात दर्शन होऊ शकते. हा रात्रीच्या आकाशातील व्याधाखालोखाल दुसर्‍या क्रमांकाचा तेजस्वी तारा आहे. त्याचा रंग पिवळसर पंधरा आहे.

याचे नाव अगस्त्य ऋषींच्या नावावरून ठेवले आहे. कारण या तार्याचे अध्ययन करणारे ते पहिले विद्वान होते.

No comments:

Post a Comment