तिथी
|
श्रावण कृ. २ (१६:५०)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
पूर्वाभाद्रपदा (९:५५)
|
योग
|
धृति (९:५०), शूल (२९:५१)
|
करण
|
तैतिल (६:३८), वणिज (२७:०५)
|
श्रावणी सोमवार
दर सोमवारी महादेवाचे पूजन करावे.
शिवमुष्टी
मूग
श्रावणी सोमवारचे व्रत असते या
दिवशी शंकराला शिवमूठ वाहिली जाते.
पहिल्या सोमवारी तांदळाची, दुसर्या सोमवारी
तिळाची, तिसर्या सोमवारी मुगाची, चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा असेल तर सातूची शिवमूठ वाहिली जाते.
आपल्या शेतात पिकलेलं धान्य देवाला
अर्पण करण्याची वृत्ती इथं दिसून येते. शंकराच्या १२ ज्योतीर्लिंग असलेल्या ठिकाणी
भाविक मोठया संख्येने गर्दी करतात.
शिवामूठ वाहताना असे म्हणतात.
शिवा शिवा महादेवा,
माझी शिवामूठ ईश्वरा देवा.
सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा,
नावडती आहे ती आवडती कर रे देवा.
रविचा पूर्वाफाल्गुनी नक्षत्र प्रवेश
रवि
८:२४ ला पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करत आहे. रविचे मृग नक्षत्र ते हस्त
नक्षत्र संक्रमण हा काळ भारतात पावसाळ्याचा मुख्य काळ समाजाला जातो.
रविचे
नक्षत्र : पूर्वाफाल्गुनी
चंद्र
नक्षत्र: पूर्वाभाद्रपदा
वाहन उंदीर
रवि
नक्षत्र प्रवेशाच्या वेळी चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे यावरून वाहन ठरते. सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत मोजावे, त्यास ९ ने भागून बाकी किती राहते
त्याप्रमाणे वाहन ठरते.
बाकी
|
वाहन
|
पर्जन्य वृष्टीचे स्वरूप
|
१
|
घोडा
|
पर्वतावर पाऊस पडेल
|
२
|
कोल्हा
|
पाऊस पडणार नाही.
|
३
|
बेडूक
|
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
|
४
|
मेंढा
|
पाऊस पडणार नाही.
|
५
|
मोर
|
अल्पवृष्टी होईल.
|
६
|
उंदीर
|
अल्पवृष्टी होईल.
|
७
|
महिष
|
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
|
८
|
गाढव
|
अल्पवृष्टी होईल.
|
० / ९
|
हत्ती
|
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
|
रविचे
नक्षत्र : पूर्वाफाल्गुनी
चंद्र
नक्षत्र: पूर्वाभाद्रपदा
अंतर
: १५
१५
ला ९ ने भागले असता बाकी राहते ६. म्हणून वाहन उंदीर आहे. याचाच अर्थ रवि पूर्वाफाल्गुनी
नक्षत्रात असताना अल्प पर्जन्यवृष्टी होईल.
नक्षत्रसंज्ञा : सूर्य-चंद्र
सूर्य नक्षत्रे
|
रोहिणी, मृग, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा,
स्वाती, विशाखा, अनुराधा, जेष्ठा, मूळ, धनिष्ठा, शततारका, उत्तराभाद्रपदा
|
चंद्र नक्षत्रे
|
अश्विनी, भरणी, कृत्तिका, आर्द्रा, पुनर्वसू,
पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, पूर्वा भाद्रपदा, रेवती
|
दोन्ही सूर्य नक्षत्रे
|
वारा सुटेल
|
दोन्ही चंद्र नक्षत्रे
|
पाऊस पडणार
नाही
|
एक चंद्र व दुसरे सूर्य
|
पाऊस पडेल
|
रविचे
नक्षत्र : पूर्वाफाल्गुनी =
सूर्य नक्षत्र
चंद्र
नक्षत्र: पूर्वाभाद्रपदा =
चंद्र नक्षत्र
एक चंद्र व दुसरे सूर्य नक्षत्र आहे. याचा अर्थ रवि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात असताना पाऊस पडेल.
स्त्री-पुरुष-नपुंसक
नक्षत्रे : स्त्री-पुरुष
स्त्री नक्षत्रे
|
आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा,
मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती
|
पुरुष नक्षत्रे
|
अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी,
मृग, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा
,उत्तराभाद्रपदा, रेवती
|
नपुंसक नक्षत्रे
|
विशखा, अनुराधा, जेष्ठा
|
सूर्य
नक्षत्र स्त्री संज्ञक व चंद्र नक्षत्र नपुंसक : वारे सुटून वृष्टी मध्यम होईल
स्त्री
पुरुष असा योग असेल तर: वृष्टी समाधान कारक होईल.
रविचे
नक्षत्र : पूर्वाफाल्गुनी =
स्त्री नक्षत्र
चंद्र
नक्षत्र: पूर्वाभाद्रपदा = पुरुष
नक्षत्र
एक
स्त्री नक्षत्र तर दुसरे पुरुष नक्षत्रआहे. त्यामुळे रवि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात
असताना समाधानकारक पर्जन्यवृष्टी होईल.
पावसाचा
अंदाज घेताना या बरोबरच रविच्याच्या नक्षत्र प्रवेशाची कुंडली मांडून त्यातील ग्रह
स्थिती लक्षात घेणे देखील अत्यावश्यक आहे.
भद्रा
२७:०५ नंतर भद्रा
म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment