तिथी
|
निज आषाढ कृ ८ (१८:४८)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
भरणी (१८:४९)
|
योग
|
गंड (१२:१८)
|
करण
|
बालव (७:३३), तैतिल (३०:१०)
|
दग्धयोग
१८:४८ पर्यंत शुक्रवारी अष्टमी असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार
यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती
मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
शुक्र लोप
शुक्र या तेजस्वी ताऱ्याचा पश्चिम दिशेला अस्त होत आहे.
ग्रहांचे सूर्य सानिध्यामुळे अदर्शन होते. यालाच ‘अस्त’
असे म्हणतात.
सूर्यापासून
प्रत्येक ग्रह जितक्या अंशावर असता आपल्याला त्याचे दर्शन होऊ शकते म्हणजेच
ग्रहाचा उदय होतो, त्याला त्या ग्रहाचे ‘कालांश’ असे संबोधतात. शुक्राचे
कालांश पुढीलप्रमाणे.
शुक्र
|
८
|
वक्री शुक्र
|
७||
|
शुक्र हा शुभग्रह असल्यामुळे तो अस्तंगत असताना अनेक शुभ कार्यांना वर्ज असतो.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment