Wednesday, 10 May 2017

दिनविशेष - ११ मे २०१७



तिथी
 वैशाख कृष्ण १ (२९:२९)   
वार
 गुरुवार
नक्षत्र
 विशाखा (१७:१९)
योग
 वरीयान (१६:५५)
करण
 बालव (१६:१९), कौलव (२९:२९)


देवर्षी नारद जयंती

वैशाख कृष्ण प्रतिपदा ही नारदाची जन्मतिथी देवर्षी नारद जयंती म्हणून साजरी केली जाते.
पुराणांनुसार भारतातील ऋषीमुनींपैकी फक्त नारदमुनींनाच देवर्षी ही पदवी मिळाली होती. जवळपास सर्वच हिंदू ग्रंथांमध्ये उल्लेख आढळणारे ते एकमेव ऋषी आहेत. सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापर युगातही नारदमुनी देवी-देवतांमध्ये संवादाचे माध्यम होते. सदैव सतर्क राहणारे नारद हे ब्रह्मदेवाच्या मुलांपैकी सनक, सनंदन, सनत आणि सनातन या सर्वांपेक्षा लहान होते. ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वरदानानुसार आकाश, पाताळ तसेच पृथ्वी या तिन्ही लोकी भ्रमण करून नारद देव, संत-महात्मे, इंद्रादी शासक आणि जनमानसाशी थेट संवाद साधून त्यांची सुख-दु:खे जाणून घेत अडचणी निवारण्यासाठी प्रयत्न करत. म्हणूनच तर ते देवांना जेवढे प्रिय होते, तेवढेच ते राक्षसांमध्येही प्रिय होते. यासोबतच देव आणि दानवांमध्ये संघर्ष निर्माण करणे किंवा युद्ध भडकवणे हा त्यांचा कळलावागुणही प्रसिद्ध आहे. यामुळे त्यांना अनेकदा अपमानितही व्हावे लागले आहे. मात्र, समाजहित हाच एकमेव उद्देश असलेल्या नारदाने मान-अपमानाची कधीच पर्वा केली नाही. त्यांना विश्वातील आद्य पत्रकार म्हणून ओळखले जाते.

इष्टि

इष्टि  म्हणजे यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.

रवि कृत्तिका नक्षत्र प्रवेश

१२:०२ ला रवि कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करीत आहे.

प्रतिपदा श्राद्ध

अपराण्ह काळी प्रतिपदा तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी वैशाख कृष्ण १ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment