तिथी
|
वैशाख शुक्ल १० (१९:४५)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
पूर्वाफाल्गुनी (३०:०९)
|
योग
|
ध्रुव (१५:३८)
|
करण
|
तैतिल (७:३३), गरज (१९:४५)
|
विश्वरूप दर्शन दिवस
वैशाख शुक्ल दशमी विश्वरूप
दर्शन दिवस म्हणून साजरी केली जाते. नृसिंह सरस्वती महाराजांनी ‘श्री क्षेत्र
कुमसी’ येथे श्री त्रिविक्रम भारती यांना वैशाख शुक्ल दशमीच्या दिवशी विश्वरूप
दर्शन दिले. या घटनेचा उल्लेख पवित्र ‘गुरुचरित्र’ या धर्मग्रंथातील अध्याय
क्रमांक २४ मध्ये पाहायला मिळतो.
दशमी श्राद्ध
अपराण्ह काळी दशमी
तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी वैशाख शुक्ल १० आहे
त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment