तिथी
|
वैशाख कृष्ण २ (अहोरात्र)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
अनुराधा (२०:१३)
|
योग
|
परिघ (१७:४७)
|
करण
|
तैतिल (१८:३९), गरज (--:--)
|
शबेबरात / शब-ए-बारात
शब
म्हणजे रात्र आणि बारात म्हणजे मुक्त होणे. इस्लामी कॅलेंडर नुसार शबान महिन्यातील
१४ व्या दिवशीच्या सुर्यास्तानंतर हि रात्र सुरु होते. मुस्लीम समाजात याला अतिशय
महत्व आहे. असे मानले जाते कि या दिवशी मुहम्मद पैगंबर मक्केत आला होता. या
दिवसाबाबत अशीही एक मान्यता आहे कि या रात्री अल्लाह सर्व पुरुषांनी केलेल्या
कर्मानुसार त्याचे पुढील वर्षभराचे भवितव्य ठरवतो. या दिवशी सर्व मुस्लीम लोक
अल्लाह ची प्रार्थना करतात.
द्वितीया श्राद्ध
अपराण्ह काळी द्वितीया
तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी वैशाख कृष्ण २ आहे
त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment