तिथी
|
वैशाख शुक्ल ८ (१४:१६)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
पुष्य (१७:०३)
|
योग
|
शूल (२३:४५)
|
करण
|
बव (१४:१६), बालव (२५:२०)
|
दुर्गाष्टमी
प्रत्येक
महिन्यातील शुक्ल अष्टमीला दुर्गाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी दुर्गामातेचे पूजन
शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.
वैशाख अष्टमी
या
दिवशी या व्रतासाठी म्हणून आम्ररसाने (आंबरसाने) स्नान करावे. अपराजितीदेवीला उसीर
व जटामांसीमिश्रित पाण्याने स्नान घालावे. नंतर पंचगंधांनी (जायफ़ळ, पूगफ़ल, कापूर, कंकोळ
आणि लवंग) लेपन करुन गंधफ़ुलांनी पूजा करावी. तूपसाखरयुक्त खिरीचा नैवद्य
दाखवावा.स्वत: उपवास करावा व दुसरे दिवशी ब्राह्मणओजन घालून मग स्वत: जेवावे.
यामुळे समस्त तीर्थस्नाचे पूण्य मिळते.
अष्टमी नवमी श्राद्ध
अपराण्ह काळी अष्टमी आणि नवमी या
दोन्ही तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध
तिथी वैशाख शुक्ल ८, किंवा वैशाख शुक्ल ९ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे
महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या
काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा
सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त
सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ
बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment