तिथी
|
माघ कृष्ण ८ (२९:२१)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
अनुराधा (२३:०३)
|
योग
|
व्याघात (१०:४६)
|
करण
|
बालव (१६:५८), कौलव (२९:२१)
|
घृतकंबलदान
हे व्रत माघ महिन्यातील
कोणत्याही अष्टमीस वा चतुर्दशीस करतात. पांढर्या किंवा काळ्या गाईचे घट्ट तूप
शिवलिंगावर माखणे व त्याचे दान देणे.
दानाचा विधी:
प्रथम संकल्प
करून शिवाची पूजा करतात व शिवलिंगावर तूप थापतात. नंतर तीळ, मोहर्या, बेलाची पाने या वस्तू
देवला वाहतात. शेवटी
'शिवाय नम:'
या मंत्राचा
यथाशक्ती जप करतात. मग ते माखलेले तूप दान देतात. रात्री जागरण करतात. प्रात:काळी
स्नान झाल्यावर पुनश्च शंकराची पूजा करून शिवभक्तांना भोजन घालतात. स्वत: भोजन
करून व्रतसमाप्ती करतात.
फल - दारिद्र्यनाश, सुखोपभोगाची
प्राप्ती व शिवलोकाची प्राप्ती.
कालाष्टमी
प्रत्येक
महिन्यातील कृष्ण अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी शिव पूजन शुभ
मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.
अष्टका श्राद्ध
धर्मसिंधु नुसार षण्णवती म्हणजे एकूण ९६ श्राद्धे सांगितली आहेत.
ती पुढीलप्रमाणे :
अमावास्या
|
१२
|
युगादि
|
४
|
मन्वादि
|
१४
|
संक्रांति
|
१२
|
वैधृती
|
१२
|
व्यतिपात
|
१२
|
महालय
|
१५
|
अष्टका
|
५
|
अन्वष्टका
|
५
|
पूर्वेद्यु
|
५
|
एकूण
|
९६
|
अष्टमी श्राद्ध
अपराण्ह काळी अष्टमी
तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी माघ कृष्ण ८ असेल तर या दिवशी
श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ:
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
©संकलन: सौ. प्राची शिंदे.
No comments:
Post a Comment