Tuesday, 1 December 2015

दिनविशेष - २ डिसेंबर २०१५

तिथी
 कार्तिक कृष्ण ७ (२४:०५) 
वार
 बुधवार
नक्षत्र
 मघा (३०:२३)
योग
 वैधृति (३०:४८)
करण
 विष्टी (११:०८)

भद्रा

११:०८ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.  विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

लक्ष्मीपदव्रत

कृच्छ व्रतांपैकी एक व्रत. कार्तिक वद्य सप्तमी ते दशमीपर्यंत दूध, बिल्वपत्रे, कमळे आणि कमळांचे तंतू सेवन करणे, एकादशीला उपवास आणि या पाच दिवसांत केशवाची पूजा करणे असा विधी आहे.
फल- विष्णुलोकप्राप्ती.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Monday, 30 November 2015

दिनविशेष - १ डिसेंबर २०१५

तिथी
 कार्तिक कृष्ण ६ (२२:२१) 
वार
 मंगळवार
नक्षत्र
 आश्लेषा (२८:०२)
योग
 ऐंद्र (३०:२७)
करण
 गरज (९:४७)

भद्रा


२२:२१ नंतर भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

दिनविशेष - ३० नोव्हेंबर २०१५

तिथी
 कार्तिक कृष्ण ५ (२१:२४) 
वार
 सोमवार
नक्षत्र
 पुष्य (२६:२३)
योग
 शुक्ल (७:२७), ब्रह्मा (३०:३८)
करण
 कौलव (९:१४)


सर्वसामान्य दिवस

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Saturday, 28 November 2015

दिनविशेष - २९ नोव्हेंबर २०१५

तिथी
 कार्तिक कृष्ण ४ (२१:१७) 
वार
 रविवार
नक्षत्र
 पुनर्वसु (२५:३२)
योग
 शुभ (८:५६)
करण
 बव (९:३३)

संकष्टी चतुर्थी

पुणे चंद्रोदय : २१:२१
या चतुर्थीला 'बहुला चतुर्थी' म्हणतात. ही वक्रतुंडाची तिथी प्रसिद्ध आहे. या दिवशी सर्व दिवस दूध पिऊन व्रत करावे. उपास करावा. रात्री चंद्रोदयानंतर पुन्हा स्नान करून वक्रतुंडाची षोडशोपचारे पूजा करावी. नंतर ब्राह्मणभोजन घालून सुवर्णदक्षिणा द्यावी. मग स्वत: जेवावे. हे व्रत पापविनाशी आहे. यायोगे सर्व दु:खांचे अपहरण होते व सुख मिळते. या व्रताच्या आचरणाने पूर्वीच्या काळी कर्दम नावाचा राजा क्षयरोगमुक्‍त होऊन अंती देवलोकास गेला. तसेच एक पापकर्मा, अत्याचारी चांडाळ अनायासे घडलेल्या व्रताच्या प्रभावाने देवलोकी गेला.

करक चतुर्थी व्रत

हे एक स्त्रीव्रत आहे. कार्तिक कृष्ण चतुर्थीस हे व्रत करतात. गौरी ही या व्रताची प्रधान देवता असून शिव, गणेश व कार्तिकेय या गौण देवता आहेत. हे व्रत सायंकाळी करतात. या व्रताचा विधी-
व्रत-देवतांची चित्रे काढून ती वडाच्या झाडाखाली पूजास्थानी ठेवतात. मग स्नान संकल्प, गणपतिपूजा इ. झाल्यावर गौरीची पूजा करतात. मग पुढील मंत्राने प्रार्थना करतात.

नम: शिवायै शर्वाण्ये सौभाग्यं संततिं शुभाम् ।
प्रयच्छ भक्‍तियुक्‍तानां नारीणा हरिवल्लभे ॥

या व्रतात अन्नधान्य, दीपसहित दहा जलपूर्ण कुंभांचे दान, पोळीचा नैवेद्य, चंद्रोदय झाल्यावर त्याला अर्घ्यप्रदान करावयाचे असते.
फल – सौभाग्यप्राप्ती.

दशरथ चतुर्थी

कार्तिक कृष्ण चतुर्थीला 'दशरथ चतुर्थी' असे म्हणतात. हे एक व्रत आहे. एका मातीच्या पात्रात दशरथाची आणि दूर्गेची मूर्ती ठेवून त्यांची पूजा करतात. हिला करक (करक = करा = मातीचे भांडे ) चतुर्थी असेही म्हणतात.
फल - सर्व प्रकारच्या फलांचा लाभ.

घबाड

२१:१७ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: अनुराधा
चंद्र नक्षत्र : पुनर्वसु
तिथी: १५ + ४ = १९
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८ x ३ = ५४
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १९ तिथी मिळवू : ५४+१९ = ७३
आता ७ ने भागू  ७३ / ७ = १० ३/७

बाकी ३ म्हणून घबाड.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Friday, 27 November 2015

दिनविशेष - २८ नोव्हेंबर २०१५

तिथी
 कार्तिक कृष्ण ३ (२२:०१) 
वार
 शनिवार
नक्षत्र
 आर्द्रा (२५:३०)
योग
 साध्य (११:०२)
करण
 वणिज (१०:४१)

घबाड

२५:३० नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: अनुराधा
चंद्र नक्षत्र : पुनर्वसु
तिथी: १५ + ४ = १९
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८ x ३ = ५४
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १९ तिथी मिळवू : ५४+१९ = ७३
आता ७ ने भागू  ७३ / ७ = १० ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

भद्रा


१०:४१ नंतर २२:०१ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Thursday, 26 November 2015

दिनविशेष - २७ नोव्हेंबर २०१५

तिथी
 कार्तिक कृष्ण २ (२३:३०) 
वार
 शुक्रवार
नक्षत्र
 मृग (२६:१३)
योग
 सिद्ध (१३:४२)
करण
 तैतिल (१२:३०)

सर्वसामान्य दिवस

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Wednesday, 25 November 2015

दिनविशेष - २६ नोव्हेंबर २०१५

तिथी
 कार्तिक कृष्ण १ (२५:३८) 
वार
 गुरुवार
नक्षत्र
 रोहिणी (२७:३६)
योग
 शिव (१६:४९)
करण
 बालव (१४:५३)

इष्टि

इष्टि  म्हणजे यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.

मृत्यूयोग

२७:३६ नंतर गुरुवारी मृग नक्षत्र असल्यामुळे होणारा मृत्यू योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.

रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट