Sunday, 15 May 2016

दिनविशेष - १६ मे २०१६


तिथी
 वैशाख शुक्ल १० (१४:५०)  
वार
 सोमवार     
नक्षत्र
 उत्तराफाल्गुनी (अहोरात्र)
योग
 हर्षण (२०:२२)
करण
 वणिज (२८:०२)

दग्ध योग

१४:५० नंतर सोमवारी एकादशी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


भद्रा


२८:०२ नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

Saturday, 14 May 2016

दिनविशेष - १५ मे २०१६


तिथी
 वैशाख शुक्ल ९ (१२:४२)  
वार
 रविवार     
नक्षत्र
 पूर्वाफाल्गुनी (२८:२४)
योग
 व्याघात (१९:३४)
करण
 तैतिल (२५:४३)

अगस्ति लोप


अगस्ति हा तारा अस्त होत आहे. अगस्ति ताऱ्याचा समुद्राच्या स्थितीशी संबंध आहे असे आढळून आल्यामुळे त्याचे उदयास्त ज्योतिष ग्रंथात समाविष्ट केले गेले.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

Friday, 13 May 2016

दिनविशेष - १४ मे २०१६


तिथी
 वैशाख शुक्ल ८ (११:०५)  
वार
 शनिवार     
नक्षत्र
 मघा (२५:५२)
योग
 ध्रुव (१९:०८)
करण
 बालव (२३:४९)

दुर्गाष्टमी

प्रत्येक महिन्यातील शुक्ल अष्टमीला दुर्गाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी दुर्गामातेचे पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.

वैशाख अष्टमी

या दिवशी या व्रतासाठी म्हणून आम्ररसाने (आंबरसाने) स्नान करावे. अपराजितीदेवीला उसीर व जटामांसीमिश्रित पाण्याने स्नान घालावे. नंतर पंचगंधांनी (जायफ़ळ, पूगफ़ल, कापूर, कंकोळ आणि लवंग) लेपन करुन गंधफ़ुलांनी पूजा करावी. तूपसाखरयुक्त खिरीचा नैवद्य दाखवावा.स्वत: उपवास करावा व दुसरे दिवशी ब्राह्मणओजन घालून मग स्वत: जेवावे. यामुळे समस्त तीर्थस्नाचे पूण्य मिळते.

रवि  वृषभ राशीत प्रवेश

१६:४१ ला रवि वृषभ राशीत प्रवेश करीत आहे.
रवि संक्रमणाच्या वेळी,  वृषभ राशीसाठी संक्रमणापूर्वी १६ घटिका पुण्यकाळ असतो. मात्र यामध्ये रात्रीची वेळ घेत नाहीत. पुण्याकालात स्नान, दान इ. गोष्टी अधिक शुभ मानल्या आहेत. म्हणून पुण्यकाल १०:१७ ते १६:४१ असा आहे.
सामुदायिक मुहूर्त ३० म्हणजे साम्यार्घ आहेत. रविच्या राशी संक्रमाणाच्या वेळी असणाऱ्या चंद्र नक्षत्रावरून ३ प्रकारचे सामुदायिक मुहूर्त होतात. ते व त्यांची फळे पुढील प्रमाणे:
·         १५ : महर्घ / जघन्य : फळ = तेजी
·         ३० : साम्यार्घ : फळ = सम
·         ४५ : समर्घ : फळ = मंदी

दग्ध योग

११:०५ नंतर शनिवारी नवमी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी




संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

Thursday, 12 May 2016

दिनविशेष - १३ मे २०१६


तिथी
 वैशाख शुक्ल ७ (१०:११)  
वार
 शुक्रवार     
नक्षत्र
 आश्लेषा (२३:५६)
योग
 वृद्धी (१९:१२)
करण
 विष्टि (२२:३२)

कमल सप्तमी

या व्रतासाठी कमल आणि सुर्य यांच्या सुवर्णमुर्ती कराव्यात. या दिवशी वेदीवर कमल व कमलावर सुर्य मुर्ती स्थापन करावी. त्यांचे यथाविधी पूजन करावे.
नमस्ते पद्महस्ताय नमस्ते विश्वधारिणें ।
दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते ॥ 
अशी सुर्याची मग प्रार्थना करावी. सुर्यास्ताच्यावेळी एक जलपूर्ण घागर, एक गाय व वरील कमलादी ब्राह्मणाला दान द्यावीत व दुसरे दिवशी त्यांस भॊजन घालून मग आपण जेवावे. याप्रमाणे प्रति शुक्ल सप्तमीला एक वर्षभर व्रत करावे, म्हणजे सर्व सुखे प्राप्त होतात.


निम्बसप्तमी

वैशाख शुक्ल सप्तमी दिवशी स्नान वगैरे नित्यकर्मे करुन अक्रोध व जितेन्द्रिय राहून निंबाची पाने आणावीत व
निम्बपल्लव भद्रं ते सुभद्रं तेऽस्तु वै सदा।
ममापि कुरु भद्रं वै प्राशनाद्रोगहा भव ॥
हा मंत्र म्हणत म्हणत एकेक पान खावे. भूमिशयन करावे व अष्टमीला सुर्यनारायणाचे पूजन करून , ब्राह्मणभोज घालून मग स्वत: भोजन करावे.

शर्करासप्तमी

हे व्रत वैशाख शुक्ल सप्तमीसच असते. यासाठी शुभ्रतिलमिश्रित पाण्याने स्नान करून शुभ्र वस्त्रे परिधान करावीत. एका चौरंगावर कुंकवाने अष्टदल कमल काढून
'ॐ नम: सवित्रे |'
या मंत्राने त्याची पूजा करावी. त्यावर खांडसरीने भरलेला व शुभ्र वस्त्राने आच्छादलेला सुवर्णयुक्त कोरा कलश स्थापन करावा व

विश्वदेवमयो यस्माद्वेदवादीति पठ्यसे ।
त्वमेवामृतसर्वस्वमत: पाहि सनातन ॥

या मंत्राने यथाविधी पूजन करावे व दुसरे दिवशी ब्राह्मणांना घृतशर्करामिश्रित खिरीचे भोजन घालून तो घट दान करावा. यामुळे आयुष्य , आरोग्य व ऎश्वर्य यांची वृध्दी होते.

दग्ध योग

१०:११ नंतर शुक्रवारी अष्टमी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


भद्रा

१०:११ नंतर २२:३२ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

मृत्युयोग

२३:५६ पर्यंत शुक्रवारी आश्लेषा नक्षत्र असल्यामुळे मृत्यु योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त

हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो. असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने वंग प्रांतात पहिला जातो. 

२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष रहात नाही.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट