तिथी
|
वैशाख शुक्ल ८ (११:०५)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
मघा (२५:५२)
|
योग
|
ध्रुव (१९:०८)
|
करण
|
बालव (२३:४९)
|
दुर्गाष्टमी
प्रत्येक
महिन्यातील शुक्ल अष्टमीला दुर्गाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी दुर्गामातेचे पूजन
शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.
वैशाख अष्टमी
या दिवशी या
व्रतासाठी म्हणून आम्ररसाने (आंबरसाने) स्नान करावे. अपराजितीदेवीला उसीर व
जटामांसीमिश्रित पाण्याने स्नान घालावे. नंतर पंचगंधांनी (जायफ़ळ, पूगफ़ल, कापूर, कंकोळ आणि लवंग) लेपन करुन गंधफ़ुलांनी पूजा करावी. तूपसाखरयुक्त
खिरीचा नैवद्य दाखवावा.स्वत: उपवास करावा व दुसरे दिवशी ब्राह्मणओजन घालून मग
स्वत: जेवावे. यामुळे समस्त तीर्थस्नाचे पूण्य मिळते.
रवि
वृषभ राशीत प्रवेश
१६:४१ ला रवि वृषभ राशीत
प्रवेश करीत आहे.
रवि
संक्रमणाच्या वेळी, वृषभ राशीसाठी संक्रमणापूर्वी १६
घटिका पुण्यकाळ असतो. मात्र यामध्ये रात्रीची वेळ घेत नाहीत. पुण्याकालात स्नान,
दान इ. गोष्टी अधिक शुभ मानल्या आहेत. म्हणून पुण्यकाल १०:१७ ते १६:४१ असा आहे.
सामुदायिक
मुहूर्त ३० म्हणजे साम्यार्घ आहेत. रविच्या राशी संक्रमाणाच्या
वेळी असणाऱ्या चंद्र नक्षत्रावरून ३ प्रकारचे सामुदायिक मुहूर्त होतात. ते व
त्यांची फळे पुढील प्रमाणे:
·
१५ : महर्घ / जघन्य : फळ = तेजी
·
३० : साम्यार्घ : फळ = सम
·
४५ : समर्घ : फळ = मंदी
दग्ध योग
११:०५ नंतर शनिवारी नवमी
तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार
यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती
मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
|
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment